Ranbir Kapoor Animal Movie Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor Viral Video: अखेर रणबीर कपूरच्या 'त्या' व्हिडिओ मागील सत्य आले समोर

या व्हिडिओतून रणबीर एका ब्रँडचे प्रमोशन करत आहे.

Pooja Dange

Truth Behind The Viral Video Of Ranbir Kapoor: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर रागात त्याच्या एका फॅनचा फोन फेकताना दिसत आहे. फॅन रणबीरसोबत सेल्फी घेत असतो.

सेल्फी घेऊन झाल्यावर रणबीर फॅनच्या फोनमध्ये सेल्फी बघण्यासाठी फोन घेतो आणि तो फेकून देतो. रणबीरच्या या व्हिडिओवर अनेक फॅन्स नाराज झाले होते. यावरून रणबीरला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले. आता या व्हिडिओ मागील सत्य समोर आले आहे. चाल जाणून घेऊया रणबीरने असे का केले?

हा व्हिडिओ स्मार्टफोन कंपनी ओप्पोच्या जाहिरातीचा भाग आहे. व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले आहे की रणबीर कपूरच्या आजूबाजूला अनेक लोक असतात. माध्यमांचे प्रतिनिधी रणबीरचे फोटो क्लिक करत असतात. दरम्यान रणबीर सेल्फी घेणाऱ्या त्याच्या फॅनचा फोन फेकून देतो.

ओप्पो इंडियाने ही जाहिरात ट्विट केली आहे. तसेच ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'रणबीरने त्याच्या फॅन चा फोने का फेकला?' रणबीर ओप्पोचा ब्रँड अँबेसेडर आहे. या जाहिरातीतून रणबीर रेनो सीरीजचे प्रमोशन करत आहे. ही जाहिरात कंपनीचा नवीन फोन 'ओप्पो रेनो ८ टी'साठी बनविण्यात आली आहे.

रणबीर कपूरच्या व्हायरल झालेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर फोन फेकताना दाखविण्यात आला आहे. तर आता व्हायरल होत असलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये रणबीर त्याच्या फॅनला ब्रँड न्युव 'ओप्पो रेनो ८ टी' देताना दिसत आहे. त्यानंतर त्याचा फॅन खुश होतो आणि नवीन फोनमधून पुन्हा रणबीरसोबत सेल्फी घेतो.

रणबीरच्या व्हायरल झालेल्या जुन्या व्हिडिओवर जसे नेटकरी कमेंट करत होते. तसेच पुन्हा नवीन व्हिडिओ देखील कमेंट करत आहेत. काहीजण रणबीरच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत तर काहीजण आमचा सुद्धा फोन फेका, असं म्हणत आहेत.

रणबीरचा 'तू झुटी मैं मक्कर' हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये रणबीरसह श्रद्धा कपूर देखील मुख्य भूमिका साकारणार आहे. तर 'अॅनिमल' या चित्रपटाच्या माध्यमातून रणबीर एक वेगळी भूमिका साकारणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT