Maharashtrachi Hasya Jatra
Maharashtrachi Hasya Jatra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maharashtrachi Hasya Jatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून 'या' तिघांनी साऱ्या जगाला खळखळून हसवलं, पण आता तेच...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtrachi Hasya Jatra | मुंबई : चार वार कॉमेडीचा चौकार म्हणत प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'(Maharashtrachi Hasya Jatra) हा शो अल्पावधीतच प्रचंड प्रसिद्ध झाला. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीराने प्रेक्षकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण केले आहे.

प्रेक्षकांनीही या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराला भरभरून प्रेम दिले. मग ती चुलबुली लॉली असो, चिडलेला मामा असो किंवा मग फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे असो. आता लवकरच हे विनोदवीर आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १५ ऑगस्टपासून या कार्यक्रमाचे नवं पर्व सुरू होणार आहे. मात्र येत्या पर्वात काही कलाकार या कार्यक्रमात नसतील.

आपल्या विनोदाने सर्वांना खळखळून हसवणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री विशाखा सुभेदार या पर्वात नसेल. नेहमी विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री आता वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्यासाठी काही काळ विश्रांती घेणार आहे. त्याचबरोबर 'अगं अगं आई...' असं म्हणून बाबांचा धसका घेणारा विनोदवीर ओंकार भोजने देखील या कार्यक्रमात नसणार आहे, असे समजते. काही हिंदी प्रोजेक्ट्स मिळाल्यामुळे ओंकार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात नसेल. परंतु, ओंकार पहिला एक महिना प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करून या कार्यक्रमाचा निरोप घेणार आहे.

या नावांमध्ये शेवटचे नाव आहे ते म्हणजेच पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी. आपल्या काही वैयक्तिक कामांमुळे पंढरीनाथ कांबळे या कार्यक्रमात दिसणार नाही. हे तीन विनोदवीर या कार्यक्रमात नसले तरी, या मंचाचे दार या कलाकारांसाठी कायम खुले असतील, असे या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : होर्डिंग कोसळून अनेकांचा बळी, त्याच घाटकोपरमध्ये PM मोदींचा रोड शो; संजय राऊतांची टीका

Ratnagiri Crime : काेकणातील श्रमिक सहकारी पतपेढीवर दराेडा, दीड कोटींचे सोने लंपास; श्वान पथक दाखल

Lok Sabha Election 2024: मोठी बातमी! ऐन निवडणुकीत रवींद्र वायकरांना निवडणूक आयोगाची नोटीस, काय आहे नेमकं कारण?

IPL Playoffs Scenario: दिल्लीच्या विजयाचा RCB ला फायदा! प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; या संघाचं टेन्शन वाढलं

Today's Marathi News Live : नाशिकच्या मालेगावात ग्रामस्थांनी केला रास्ता रोको; वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT