Shah Rukh Khan's Pathan Film Will Cross 1000 Crores Soon  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pathaan Box-Office Collection: 'पठान' लवकरच १००० कोटी करणार पार, याआधी कोणत्या चित्रपटांनी केली अशी दमदार कमाई

Bollywood Movies List : 'पठान' चित्रपटांनी आधी कोण -कोणत्या चित्रपटांनी केला आहे १००० कोटींचा गल्ला.

Pooja Dange

Shahrukh Khan: शाहरुख खानचा 'पठान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. लवकरच हा चित्रपट १००० कोटींचा टप्पा पार करेल, असे मत व्यक्त केले जात आहे. ट्रेड विश्लेषक रमेश बाला यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, जसे यश 'पठान' चित्रपटाला मिळत आहे ते पाहता हा चित्रपट लवकरच १००० कोटींचा आकडा पार करू शकतो. जाणून घेऊया कोणत्या चित्रपटांनी हा १००० कोटींचा आकडा पार केला होता.

Dangal

२०१६मध्ये प्रदर्शित झालेला नितेश तिवारी दिग्दर्शित 'दंगल'(Dangal) हा एक स्पोर्ट्स-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३५७ रुपयांची कमाई केली. या चित्रपटात आमिर खानसोबत साक्षी तन्वर, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा ​​आणि जायरा वसीम यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

Bahubali 2

एसएस राजामौली यांचा बाहुबली(Baahubali) द कन्क्लूजन २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा हा चित्रपट आजही अनेकजण आवडीने पाहतात. या चित्रपटात प्रभास, राणा डग्गुबती, तमन्ना भाटिया आणि अनुष्का शेट्टी होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १७८८.०६ कोटींची कमाई केली.

RRR Movie

२०२२ मध्ये, एसएस राजामौली दिग्दर्शित ब्लॉकबस्टर चित्रपट RRR ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी केली. राम चरण आणि जूनियर एनटीआरच्या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ११५० कोटींहून अधिक कमाई केली.

KGF 2

प्रशांत नीलचा २०२२मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट KGF 2 देखील बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. साऊथ स्टार यशच्या या चित्रपटाने जागतिक स्तरावर १२०० कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटात संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज यांच्या प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

Pathaan

शाहरुख खानचा 'पठान' चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालता आहे. भारतसह जगभरात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. 'पठान' चित्रपटाने अवघ्या ८ दिवसात वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिसवर ६७० कोटींचा गल्ला जमावाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

SCROLL FOR NEXT