The Kerala Story Director Sudipto Sen Hospitalized
The Kerala Story Director Sudipto Sen Hospitalized Saam TV
मनोरंजन बातम्या

Sudipto Sen Hospitalize: ‘द केरला स्टोरी’च्या दिग्दर्शकांची तब्येत बिघडली; रुग्णालयात उपचार सुरू...

Chetan Bodke

The Kerala Story Director Sudipto Sen Hospitalized: ‘द केरला स्टोरी’चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी आली आहे. सुदीप्तो सेन यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना लगेचच रूग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे दिग्दर्शक सुदीप्तो सेन बऱ्याच दिवसांपासून व्यग्र आहेत, त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली. व्यस्त वेळापत्रक आणि विश्रांतीचा अभाव यामुळे सुदीप्तो सेन यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाली आहे.

सुदीप्तो सेन ‘द केरला स्टोरी’ च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून सततच्या प्रवासामुळे त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम झाला आहे. ‘द केरला स्टोरी’ रिलीज झाल्यापासून वादांमुळे सुदीप्तो सेन खूपच तणावात असल्याचेही बोलले जात आहे. त्या वादाचा परिणाम सुदीप्तोच्या प्रकृतीवरही झाला आहे. सुदीप्तो सेन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर चित्रपटाचे प्रमोशन आणि इतर गोष्टी थांबवण्यात आल्या आहेत.

‘द केरला स्टोरी’वर बंदी घालण्याची मागणी सातत्याने होत असून चित्रपटा विरोधात अनेक ठिकाणी निदर्शनेही झाली आहेत. मात्र असे असूनही ‘द केरला स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. ‘द केरला स्टोरी’वर यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली होती. मात्र तिथूनही बंदी उठवण्यात आली. हा चित्रपट आता पश्चिम बंगालमध्ये प्रदर्शित झाला असून दमदार कमाई करत आहे.

५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने एका महिन्याच्या आतच २१३.१७ कोटी रूपयांची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. या चित्रपटाला निर्मितीसाठी फक्त १५ ते २० कोटींच्या घरातच खर्च लागला होता. खूप कमी दिवसातच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच मोठी झेप घेतली आहे. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

Beet juice : या लोकांनी चुकूनही पिऊ नये बीटचा ज्यूस

Dharashiv News : धाराशिवमध्ये १६ बालकांना इंजेक्शनची रिअॅक्शन; ताप, उलटीमुळे हैराण

SCROLL FOR NEXT