Pallavi Joshi Accident Saam TV
मनोरंजन बातम्या

Pallavi Joshi Accident: 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटातील अभिनेत्री पल्लवी जोशीचा अपघात; भरधाव वाहनाने दिली धडक

चित्रपटाच्या शूटिंगचे काम सुरू असताना हा अपघात झाला.

Ruchika Jadhav

Pallavi Joshi Accident:'द काश्मीर फाइल्स' चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशीचा अपघात झाला आहे. हैद्राबादमध्ये अभिनेत्रीचा अपघात झाला आहे. इथे शूटिंग सुरू असताना अचानक समोरून येणाऱ्या एका वाहनाने तिला धडक दिल्याने ती खाली पडली आणि जखमी झाली. सध्या तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. (Latest Pallavi Joshi News)

मीडिया रिपोर्टनुसर, पल्लवी जोशी लवकरच 'द व्हॅक्सिन वॉर' या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच चित्रपटाच्या शूटिंगचे काम सुरू असताना हा अपघात झाला. अपघात झाल्यावर देखील अभिनेत्रीने तिचे शूटिंग पूर्ण केले. त्यानंतर ती नजीकच्या रुग्णालयात दाखल झाली. इथे आल्यावर तिने उपचार घेतले असून सध्या पल्लवी सुखरूप आहे.

पल्लवी जोशीने आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. मात्र 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटातील तिने साकारलेले पात्र प्रचंड गाजले. तिने साकारलेल्या प्राध्यापकाच्या भूमिकेने तिला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटला पुढे ऑस्करसाठी देखील निवडण्यात आले.

'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला प्रदर्शनावेळी वादाची किनार देखील लागली. मात्र चित्रपट पाहिल्यावर सर्वांनीच त्यावर कौतूकाचा वर्षाव केला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तब्बल ३४० कोटींची कमाई केली. अशात आता पल्लवीचा अपघात झाल्याने चाहते तिच्या विषयी चिंता व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT