Rochelle Rao Baby Girl Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rochelle Rao Baby Girl: 'कपिल शर्मा शो' फेम अभिनेत्री झाली आई, रोशेल रावने दिला गोंडस परीला जन्म

Rochelle Rao Blessed With Baby Girl: अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Priya More

Rochelle-Keith Baby Girl:

'कपिल शर्मा शो' (Kapil Sharma Show) फेम अभिनेत्री रोशेल रावच्या (Rochelle Rao) घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. रोशेल रावने गोंडस परीला जन्म दिला आहे. ५ वर्षांपूर्वी रोशेल रावने कीथ सिक्वेरासोबत लग्न केले होते. लग्नाच्या ५ वर्षांनंतर घरामध्ये नवीन पाहुणीचे आगमन झाल्यामुळे रोशेल आणि सिक्वेराच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्री आई झाल्याचे कळताच तिच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

रोशेल रावने १ ऑक्टोबर २०२३ रोजी मुलीला जन्म दिला. तिने ही आनंदाची बातमी दोन दिवसांनंतर शेअर केली. ही आनंदाची बातमी चाहत्यांना आणि मित्रांसोबत शेअर करण्यासाठी रोशेलने इन्स्टाग्रामवर रील शेअर केली आहे. रोशेलच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी आणि फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रोशेलने शेअर केलेल्या रीलला खूप चांगली पसंती मिळत आहे.

रोशेलने शेअर केलेल्या इन्स्टा पोस्टला सुंदर कॅप्शन दिले आहे. तिने असे लिहिले आहे की, 'आम्हाला सर्व काही देऊ शकणाऱ्या सर्वात मोठ्या आशीर्वादासाठी देवाचे आभार, आमची लहान मुलगी, बेबी सिक्वेरा, ऑक्टोबर २०२३ च्या पहिल्या दिवशी जन्मली.' रोशेलने या पोस्टसह तिच्या मुलीचे नाव उघड केलेले नाही.

'द कपिल शर्मा' शोची अभिनेत्री रोशेल लवकरच तिच्या मुलीचे नाव जाहीर करू शकते. तिच्या पोस्टमध्ये रोशेलने पुढे लिहिले की, 'या आश्चर्यकारक प्रवासात तुमच्या अतूट प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद, आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. मी या मुलासाठी प्रार्थना केली आणि मी जे मागितले ते देवाने मला दिले.' या पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या पोस्टला १७ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरून राष्ट्रवादीत विसंवाद? तटकरे आणि गर्जे यांच्यात शा‍ब्दिक चकमक, VIDEO

Bank Holiday: बँका शनिवारी सुरु असणार की बंद? वाचा RBIची सुट्ट्यांची यादी

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, आधी पोटच्या मुलीचा गळा दाबला, नंतर ६ वर्षांच्या मुलाला घेऊन विहिरीत उडी मारली

Maharashtra Live News Update : यवतमाळमध्ये अवकाळी पावसाचा फटका; १७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Chhatrapati Shivaji Maharaj forts: छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर भगवान शिवाचं मंदिर का होतं?

SCROLL FOR NEXT