Kantara Movie Prequel Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kantara Prequel: कांताराचा सिक्वेल नाही तर प्रिक्वेल येणार, खुद्द ऋषभ शेट्टीनेच केली घोषणा

कांतारा चित्रपटाने १०० दिवसांचा टप्पा पार केला आहे.

Pooja Dange

Kantara Prequel To Release In 2024: ऋषभ शेट्टीच्या कांतारा चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर तसेच बॉक्स ऑफिसवर राज्य केले. भारताच्या अतिदुर्गम भागातील ही कथा आहे. कांतारा हा प्रादेशिक चित्रपट असूनही या चित्रपटाने ४५० कोटींची कमाई केली आहे.

चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. कांताराच्या यशानंतर आता या चित्रपटाचा सिक्वेल (पुढचा भाग) येणार असल्याच्या अफवा पसरत आहेत. या जरी अफवा असल्या तरी प्रेक्षकांचा उत्साह मात्र वाढला आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या सिक्वेलची अधिकृत घोषणा कधी होणार याची वाट पाहत आहेत. अखेर निर्मात्यांनी कांतारा चित्रपट आणखी एक भाग घेऊन येणार असल्याचे सांगितले आहे.

नुकताच कांतारा चित्रपटाने १०० दिवसांचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाचे हे अभुतपूर्व यश साजरे करण्यासाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी चित्रपटाच्या पुढील भागाविषयी सांगितले आहे.

ऋषभ शेट्टीने सांगितले की, आतापर्यंत तुम्ही जे पाहिले आहे तो चित्रपटाचा दुसरा भाग आहे. म्हणूनच पुढे प्रदर्शित होणारा भाग हा चित्रपटाता प्रिक्वेल (आधीचा भाग) असणार आहे. तसेच त्याने चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची हिंट देखील दिली आहे. २०२४ पर्यंत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे ऋषभने सांगितले आहे.

ऋषभ शेट्टी म्हणाला की, "आम्ही खूप आनंदी आहोत आणि प्रेक्षकांचे आभारी आहोत ज्यांनी कांताराला अपार प्रेम आणि पाठिंबा दर्शविला आणि प्रवास पुढे नेला, सर्वशक्तिमान दैवाच्या आशीर्वादाने चित्रपटाने यशस्वीरित्या 100 दिवस पूर्ण केले आहेत आणि मी या संधीचा वापर करून चित्रपटाच्या प्रिक्वेल घोषित करू इच्छितो. कांतारा चित्रपटाचा जो तुम्ही पाहिला तो खरं तर दुसरा भाग आहे, पहिला भाग पुढच्या वर्षी येईल,”

मी कांटाराचे शूटिंग करत असताना माझ्या मनात ही कल्पना आली कारण कांताराचा इतिहास अधिक सखोल आहे. लेखनाच्या भागाचा विचार केला तर आम्ही अधिक माहिती घेत आहोत. कथेचे संशोधन अद्याप सुरू आहे. सद्धा चित्रपटाविषयी बोलणे योग्य ठरणार नाही.”

निर्माते, विजय किरगंडूर यांनी देखील याबद्दल खुलासा केला आणि ते म्हणाले, “कांताराने प्रेक्षकांना एका नवीन सिनेमाची संपूर्ण ओळख करून दिली आणि प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाविषयी आवड निर्माण झाली आहे, ती आवड टिकवून ठेवायला आणि वाढवायला आवडेल.

चित्रपटाने आता १०० दिवस पूर्ण केल्यामुळे सिक्वेलची आम्ही घोषणा केली आहे. ऋषभ आणि आमची टीम कठोरपणे काम करत आहे कारण चित्रपटात कांताराची मागील कथा उघडताना प्रेक्षकांना सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि आम्ही खात्री देतो की कांताराचा सिक्वल पूर्वीपेक्षा अधिक भव्यदिव्य असणार आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

SCROLL FOR NEXT