big b news
big b news Saam Tv
मनोरंजन बातम्या

The Journey Of India: बिग बी 'या' कार्यक्रमातून घेणार देशाचा गेल्या ७५ वर्षांचा आढावा !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: यावर्षी भारतात (INDIA) 'आझादी का अमृत महोत्सव' (Ajhadi Ka Amrit Mahotsav) साजरा केला जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाले. गेल्या ७५ वर्षातील राष्ट्राची प्रगती, प्रभाव, विविधता यशाचा सखोल आढावा घेत आहे. ज्यामध्ये देशाची तंत्रज्ञानात केलेली प्रगती, अंतराळ मोहिम, सिनेसृष्टीतील जग, चित्रपटांतील वाढते तंत्रज्ञान, देशातील आकर्षक गोष्टी, प्रेक्षकांना काही खास गोष्टी आपल्याकडे वेधून घेणाऱ्या, देशातील प्रत्येक भागातील वेगवेगळी खाद्यसंस्कृती हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न 'द जर्नी ऑफ इंडिया' (The Journey Of India) च्या माध्यमातून केला जाणार आहे.

१९४७ पासून ते आत्तापर्यंत केलेला संघर्ष चित्रित करण्यात आला आहे. आतापर्यंत देशाने विविध क्षेत्रात केलेली यशस्वी कामगिरीची कथा सादर केली जाईल. 'आझादी का अमृत महोत्सव'चे निमित्त साधत 'द जर्नी ऑफ इंडिया' या शोसाठी बिग बी अमिताभ बच्चन यांचा दमदार आवाज लाभला आहे.

कार्यक्रमाची कथा दाखवण्यासाठी ऐतिहासिक फोटो, व्हिडिओंचा वापर केला जाईल. सोबतच त्यात सुप्रसिद्ध आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नाव लौकिक करणाऱ्या दिग्गजांचेही भाषण यात समाविष्ट करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा १० ऑक्टोबर रोजी डिस्कव्हरी चॅनल, टिएलसी, डिस्कव्हरी सायन्स, डिस्कव्हरी टर्बो, डी तमिळ या चॅनलवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयर करण्यात येणार आहे.

बिग बी अमिताभ बच्चन 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात रुपेरी पडद्यावर दिसले होते, त्यानंतर आता 'गुडबाय' सारख्या चित्रपटातही ते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Edit By- Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar Fire: उल्हासनगरमध्ये अग्नितांडव; जे. के. ऑर्किड इमारतीला भीषण आग

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मत म्हणजे मोदींना मत, भाजप-ठाकरेंवर प्रकाश आंबेडकर कडाडले

Today's Marathi News Live : उल्हासनगरमध्ये स्टार्टर अकाउंटच्या कार्यालयाला लागली भीषण आग

चटईवर झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT