Jogi Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jogi Trailer: दिलजीत दोसांजच्या 'जोगी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; सत्य घटनेवर...

माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या १९८४ च्या दंगलीच्या घटनेवर आधारित चित्रपट 'जोगी'चा पहिला ट्रेलर मुंबईत 'फिल्म्स डे' ला रिलीज झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांज(Diljit Dosanjh) एक घटना प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी सज्ज आहे. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या १९८४ च्या दंगलीच्या घटनेवर आधारित चित्रपट 'जोगी'(Jogi)चा पहिला ट्रेलर मुंबईत 'फिल्म्स डे' ला रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर याने केले असून, अलीने यापूर्वी सलमान खानच्या ब्लॉकबस्टर 'सुलतान'चे दिग्दर्शन केले आहे.

एका कार्यक्रमादरम्यान दिलजीत दोसांज म्हणाला, "अभिनेता म्हणून तुम्ही साकारत असलेल्या व्यक्तिरेखेमुळे तुमची व्यक्ती म्हणूनही प्रगती होत असते. मी साकारलेली प्रत्येक भूमिका मला व्यक्ती म्हणून विकसित होण्यास मदत करते'.

'जोगी' हा चित्रपट १९८४ मध्ये दिल्लीतील प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने एकत्र असलेल्या मित्रांवर आधारित आहे. हा चित्रपट तीन मित्रांच्या लढाऊ भावनेचा एक रोमांचक आणि भावनिक प्रवास आहे. 'तांडव' आणि 'ब्लडी ब्रदर्स' या अॅमेझॅान प्राइम व्हिडीओमधील प्रसिद्ध कलाकार मोहम्मद झीशान अय्युब देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, या चित्रपटात कुमुद मिश्रा, हितेन तेजवानी आणि अमायरा दस्तूर हे कलाकारही महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर निर्मित 'जोगी' हा चित्रपट १६ सप्टेंबर २०२२ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT