vikram gokhale and subodh bhave Saam TV
मनोरंजन बातम्या

Vikram Gokhale: माझ्या आयुष्यात पाहिलेलं पहिलं नाटक विक्रम गोखलेंचं होतं; सुबोध भावेने दिला आठवणींना उजाळा

vikram gokhale and subodh bhave: मराठमोळा अभिनेता सुबोध भावे याने दिवंगत विक्रम गोखले यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Vikram Gokhale Passed Away: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी आज (शनिवारी) अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले (Vikram Gokhale)  यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अशात मराठमोळा अभिनेता सुबोध भावे याने दिवंगत विक्रम गोखले यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आपल्या आयुष्यात पाहिलेलं पहिलं नाटक विक्रम गोखले यांचं होतं असं सुबोध याने सामटीव्हीशी बोलताना सांगितलं. (Subodh Bhave Latest News)

विक्रम गोखलेंच्या निधनाबाबत अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) म्हणाला, खऱ्या अर्थाने चिरतरुण अभिनेते होते. माझ्या आयुष्यात पहिलं पाहिलेलं नाटक मी पाहिलं होतं. त्यांच काम बघून असं वाटलं होतं की काय अफाट ताकदीचे अभिनेते आहेत हे. त्यांचं स्टेजवरचं वावरणं असेल, त्यांचं बोलण असेल अशा अनेक त्याच्या गोष्टी माझ्या स्मरणात आहे. डॉ. लागू यांच्यानंतर जर अभिनायाचं तंत्र बदलत गेलं त्यातला मोठ टप्पा हे विक्रम गोखले होते. कळत-नकळत आमच्यावर त्यांचे संस्कार आहेत. ते अतिशय नैसर्गिक अभिनय करायचे. ते शरीररुपाने जरी गेले असले तरी त्यांच्या कामाने ते आपल्यातच असतील असं सुबोध भावे म्हणाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

Maharashtra News Live Update: यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

SCROLL FOR NEXT