Tamannaah Bhatia Crazy Fan  Saam TV
मनोरंजन बातम्या

Tamannaah Bhatia Reaction On Fan : चाहतीनं असं काय केलं की तमन्नाला झाले अश्रू अनावर ; क्युट व्हिडिओ व्हायरल

Tamannaah Bhatia : तमन्ना सध्या तिचा नवीन चित्रपट 'लस्ट स्टोरी २' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Pooja Dange

Tamannaah Bhatia Female Fan Made Tattoo : तमन्ना भाटिया बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तमन्ना तिच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकत असते. तमन्ना सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिच्या आणि विजय वर्माच्या रिलेशनची सर्वत्र चर्चा होत आहे.

तमन्ना सध्या तिचा नवीन चित्रपट 'लस्ट स्टोरी २' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तमन्ना नुकतीच प्रमोशनवरुन मुंबईत परत येताना स्पॉट झाली. मुंबईत येताच चाहत्यांकडून तमन्नाला एक सरप्राइज मिळाले. तमन्नाला मात्र या सरप्राइजमुळे अश्रू अनावर झाले. (Latest Entertainment News)

तमन्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तमन्ना मुंबईत परतताच एअरपोर्टवर तिला एका महिला चाहतीने एक सरप्राइज दिले. या व्हिडिओत एक महिला तमन्नाच्या पाया पडताना दिसत आहे.

त्याचसोबत महिलेने तिला एक पुष्पगुच्छ दिला आहे. एवढेच नव्हे तर तिने तिच्या हातावर तमन्नाचा टॅटू काढला आहे. त्या टॅटूवर 'लव्ह यू तमन्ना' असे लिहले आहे. हा टॅटू पाहून तमन्ना खूप भावूक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले. तमन्नाने लगेचच त्या महिलेला मिठी मारली आणि तिचे आभार मानले.

तमन्नाच्या या व्हिडिओवर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तमन्नाच खूप कौतुक केलं आहे. एकने म्हटल की,'अशी इज्जत नशीबवाल्यांनाच मिळते. देवा या चाहतीला आणि तमन्ना दोघांनीही खूश ठेवो'. तर अजून एकाने लिहलय की,'तमन्ना खूप लकी आहे'.

तमन्ना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकत्याच सोशल मीडियावरील मुलाखतीत तमन्नाने विजय वर्मासोबत असलेल्या नात्याचा खुलासा केला होता. फिल्म कम्पॅनियनशी बोलताना, तिने विजयला 'हॅपी प्लेस' म्हटलं होते. त्यांच्या नात्याची सुरवात 'लस्ट स्टोरी २' च्या सेटवर झाली असंही तिने म्हटले आहे.

तमन्नाचा विजयसोबतचा हा पहिला चित्रपट असून २९ जूनला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात काजोल, नीना गुप्ता, मृणाल ठाकूर, अंगद बेदी, अमृता सुभाष अशी कास्ट असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

SCROLL FOR NEXT