the delhi files Google
मनोरंजन बातम्या

The Delhi Files: Bengal Chapter : 'द दिल्ली फाइल्स: बंगाल चॅप्टर'चं शूटिंग पूर्ण; 'या' दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

The Delhi Files: Bengal Chapter Movie: विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या आगामी चित्रपट 'द दिल्ली फाइल्स: बंगाल चॅप्टर'चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Shruti Kadam

The Delhi Files: Bengal Chapter : चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांचा आगामी चित्रपट, द दिल्ली फाइल्स: बंगाल चॅप्टर स्वातंत्र्यदिनी थिएटरमध्ये दाखल होण्यास सज्ज आहे. चाहते या बहुप्रतिक्षित चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, निर्मात्याने एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये एक मोठा केक दिसतो आणि टीम युनिट आनंदाने केक कापून आनंद साजरा करत आहे.

'द दिल्ली फाइल्स: बंगाल चॅप्टर' कधी प्रदर्शित होईल?

द दिल्ली फाइल्स: बंगाल चॅप्टरच्या टीम सदस्यांचे म्हणणे आहे की, प्रत्येकाने भारताच्या इतिहासावर, राजकारणावर आणि सामाजिक गतिशीलतेवर चर्चा करण्यास सज्ज व्हावे. विवेकने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “आणि… काम पूर्ण झाले!” #द दिल्लीफाईल्स - बंगाल चॅप्टर... स्वातंत्र्यदिनी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

विवेक रंजन यांनी 'द दिल्ली फाइल्स: बंगाल चॅप्टर'चे दिग्दर्शन केले आहे.

'द दिल्ली फाइल्स: बंगाल चॅप्टर'चे दिग्दर्शन विवेक रंजन अग्निहोत्री करणार आहेत तर, अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तेज नारायण अग्रवाल आणि आय एम बुद्धा प्रॉडक्शन्स प्रस्तुत, हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनी जगभरात प्रदर्शित होईल.

'द दिल्ली फाइल्स' दोन भागात प्रदर्शित होणार आहे.

'द दिल्ली फाइल्स'चा प्रवास गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झाला, जेव्हा विवेक अग्निहोत्री यांनी चित्रीकरण सुरू करण्याची घोषणा केली. सोशल मीडियावर बातमी शेअर करताना त्यांनी लिहिले, “शुभरांभ! तुमच्या आशीर्वादाने #Thedelhifiles चे चित्रीकरण सुरू झाले आहे. क्रू मेंबर्सनी पूजा केली. ऑक्टोबरमध्ये, विवेकने हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार असल्याचे उघड केले, ज्यामुळे प्रेक्षक आणखी उत्साहित झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

SCROLL FOR NEXT