Jacqueline Fernandez  Saam Tv
मनोरंजन बातम्या

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी कमी होईनात!, नव्याने समन्स बजावला

कोर्टाने जॅकलिनला मनी लॅंड्रिंग प्रकरणाशी संबंधित समन्स बजावला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस(Jacqueline Fernandez) सध्या वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आहे. अलीकडेच मनी लॅंड्रिंग प्रकरणाशी जॅकलिनचे नाव जोडले गेले. अशा परिस्थितीत जॅकलिनच्या अडचणी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहेत. अलीकडेच कोर्टाने जॅकलिनला मनी लॅंड्रिंग प्रकरणाशी संबंधित समन्स बजावला होता. माहितीनुसार, कोर्टाने(Court) समन्स बजावल्यानंतर जॅकलिनची सोमवारी दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली. आता या प्रकरणाशी संबधित नवीन मोठी अपडेट समोर आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिनने काही कारणास्तव चौकशी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यावर न्यायालयाने सोमवार १२ सप्टेंबर ते बुधवार १४ सप्टेंबरपर्यंत तपास पुढे ढकलला आहे. आता दिल्ली पोलिसांनी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा समन्स बजावला आहे. १४ सप्टेंबरला तिला चौकशीला हजर राहावे लागणार आहे.

जॅकलिनला १४ तारखेला आर्थिक गुन्हे शाखा (EOW) समोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनचे नाव सातत्याने समोर येत आहे. 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणाशी संबंधित दिल्ली पोलिसांनी जॅकलिन फर्नांडिसला समन्स बजावले होते. ज्यामध्ये जॅकलिनला चौकशीसाठी १२ सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु जॅकलिन तिच्या पूर्वनियोजित कामामुळे हजर राहू शकली नाही. यामुळेच दिल्ली पोलिसांनी तिची सोमवारी होणारी चौकशी पुढे ढकलली होती. त्यामुळेच आता जॅकलिनला नव्याने समन्स बजावण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी जॅकलिनला समन्स बजावण्याची ही तिसरी वेळ आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जॅकलिन १२ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता मंदिर मार्गावरील आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) च्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार होती. मात्र एका दिवसापूर्वी जॅकलिनने उपस्थित राहू शकणार नसल्याचे नमूद केले. जॅकलिनने वैयक्तिक कामामुळे हजर राहता येणार नसल्याचे सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pohe Nachni Handvo Recipe: हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायचा आहे? मग घरी झटपट बनवा पोहे आणि नाचणी हांडवो

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Mumbai : धक्कादायक! केईम हॉस्पिटलमध्ये रूग्णाने केली आत्महत्या, हादरवणारे कारण आले समोर

विधानपरिषदेत शिंदेसेनेला 2 जागा; विदर्भातून या नावाची चर्चा, कुणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT