Jhalak Dikhhla Jaa 10  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jhalak Dikhhla Jaa 10 : मराठमोळी चंद्रा- चंद्रमुखीची जबरदस्त जुगलबंदी, माधुरी-अमृताचा व्हिडिओ व्हायरल

'झलक दिखला जा' या शोचा १० वा सीझन तब्बल ५ वर्षांनतर प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा प्रसारित होणार आहे.

श्रेयस सावंत

Jhalak Dikhhla Jaa 10 | मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीत अनेक नवीन शो प्रसारित होत असतात. त्यातील प्रत्येक शोची वेगळी शैली असते. काही शो प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात तर काही शो प्रेक्षकांची मने जिंकण्यास अयशस्वी होतात. असाच एक प्रसिद्ध शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येणार आहे. या शोचे अतापर्यंत ९ सीझन प्रसारित झाले असून, प्रत्येक सीझन सुपरहिट झाला आहे. हा प्रसिद्ध शो म्हणजे सेलिब्रिटी रियालिटी डान्स शो 'झलक दिखला जा'(Jhalak Dikhhla Jaa). तब्बल ५ वर्षांनतर प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा या शोचा १० वा सीझन लवकरच प्रसारित होणार आहे.

'झलक दिखला जा' हा शो सर्वात जुना असून याची सुरुवात २००६ पासून झाली होती. या शोची घोषणा केल्यापासून निर्माते या शोचे जोरदार प्रोमोशन करत आहेत. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी कलाकार दिसणार असून मराठी चित्रपटसृष्टीची लाडकी चंद्रा म्हणजेच अमृता खानविलकर देखील या शोमध्ये मराठमोळा जलवा दाखवताना दिसणार आहे. अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar) याआधी 'नच्च बलिये' या डान्स शोमध्ये विजेती झाली होती. विशेष म्हणजे अमृताने या शोसाठी एक खास प्रोमो शूट केला असून, त्यात नृत्य अप्सरा माधुरी दीक्षितसोबत जुगलबंदी करताना दिसली आहे. या दोघींचा हा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

'झलक दिखला जा'च्या १० व्या सीझनमध्ये निया शर्मा, धीरज धूपर, शिल्पा शिंदे, पारस कालनावत, अमृता खानविलकर, नीती टेलर आणि गश्मीर महाजनी यासारखे कलाकार आपला नृत्याविष्कार सादर करताना दिसणार आहेत. या शोची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोचा आणखी एक प्रोमो रिलीज झाला असून अभिनेता गश्मीर महाजनीसोबत बॉलिवूडची नृत्यांगणा नोरा फतेही आपल्या खास अदा दाखवताना दिसली. 'झलक दिखला जा'चा १०वा सीझन ३ सप्टेंबरपासून शनिवार-रविवारी रात्री ८ वाजता कॅलर्स वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips For Man: पुरूषांनी वजन कमी करण्यासाठी 7 टिप्स फॉलो करा, सुटलेलं पोट जाईल आत

Chapati Tips : रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवता? ही १ चूक पडू शकते महागात

Maharashtra News Live Update: जालना जिल्ह्यात हैदराबाद गॅझेटनुसार 421 अर्जापैकी 377 प्रमाणपत्र वितरित

Friday Horoscope: आर्थिक लाभ, प्रेमाची कबुली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

SCROLL FOR NEXT