Jui Gadkari 
मनोरंजन बातम्या

Jui Gadkari: 'साक्षात देवीच प्रकटली...' जुई गडकरीने सांगितला कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाचा सुंदर अनुभव

Jui Gadkari: अभिनेत्री जुई गडकरीने नवरात्रौत्सवादरम्यान कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनाचा अनुभव शेअर केला आहे.

Manasvi Choudhary

आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात नवरात्रोत्सव या सणाची धामधूम सुरू आहे. नऊ दिवस या सणाचा आनंद सर्वत्र पाहायला मिळतो. सर्वसामान्यापासून ते कलाकारमंडळी सर्वच नवरात्रोत्सवाचा आनंद लुटतात. ठरलं तर मग फेम अभिनेत्रीने नुकतीच नवरात्रोत्सवानिमित्त तिचा अनुभव सांगितला आहे. जुई गडकरीने कोल्हापूरच्या देवी अंबाबाईच्या दर्शनावेळी घडलेला सुंदर अनुभव शेअर केला आहे.

अभिनेत्री जुई गडकरी दरवर्षी कोल्हापूरच्या देवी अंबाबाईच्या दर्शनासाठी जाते. जुई गडकरीने पोस्टमध्ये तिच्यासोबतचा अनुभव शेअर केलाय पोस्टमध्ये जईने, "दरवर्षी असं काहीतरी घडतं आणि मला कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी जाण्याचा योग येतो. एक वर्षी नवरात्रौत्सवादरम्यान अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरला गेले होते. गर्दीत मी देखील रांगेत देवीच्या दर्शनासाठी उभी होते. या काळात देवीच्या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. घरातून निघताना अनेकांनी मला सांगितले होते. नवरात्रीमध्ये तिकडे नको जाऊस, कारण खूप गर्दी असते. तरीही मी तिथे गेले, रांगेमध्ये उभी असताना अचानक तिकडे एक गुरूजी आले आणि ते मला म्हणाले दर्शन घ्यायचंय ना? मी देखील हो म्हणाले. मी तोंडाला स्कार्फ लावलेला होता. ओळख नसतानाही गुरूजींनी मला दर्शनासाठी आतमध्ये देवळात नेले. गाभाऱ्याजवळ उभं राहिल्यानंतर त्यांनी पाणी शिंपडले. पुढे त्यांनी मला तोंडावरचा स्कार्फ काढं असं म्हटलं. मी तिथे उभी राहिले. त्यानंतर मागे वळून पाहिले तेव्हा तिथे ते गुरुजी नव्हते.' नेमके त्या क्षणाला मला मंदिरात घेऊन जाणारे ते गुरुजी कोण होते, असा प्रश्न माझ्या मनात आला."

जुईने पुढे म्हटले की, "गाभाऱ्यातील गुरुजी प्रसादाचे पाणी उडवत होते, त्यांनी मला बरोबर त्यावेळीच तिथे आणले आणि माझं तसं दर्शन झालं. मला असं वाटलं की खुद्द देवीनेच मला आतमध्ये बोलावून घेतलं आणि तो प्रसाद दिला. त्यामुळे माझा देवीवर खूप विश्वास आहे.' अभिनेत्रीने अंबाबाईच्या मंदिरात जाण्याचा जास्तीत जास्त योग यावा अशी इच्छाही व्यक्त केली. अभिनेत्री जुईने ११ ऑक्टोबरपासून 'उदे गं अंबे' ही मालिका सुरू होणार असण्याचं सांगितलं आहे. याचनिमित्ताने तिने मालिकेच्या प्रमोशननिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचा सुंदर अनुभव शेअर केला आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टात केले हजर

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT