Jui Gadkari  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jui Gadkari: सुंदर दिसण्यासाठी जुईने गडकरीने केली सर्जरी, स्वत:च फोटो पोस्ट करत दाखवलं नवं रूप

Jui Gadkari Shared After Surgery New Photos: अभिनेत्री जुई गडकरीने शस्त्रक्रिया केली आहे. स्वत: जुईने याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.

Manasvi Choudhary

मनोरंजनविश्वातली लोकप्रिय 'ठरलं तर मग' या मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री जुई गडकरीने शस्त्रक्रिया केली आहे. स्वत: जुईने याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर जुईने शस्त्रक्रिया झाल्यानंतरचे तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये जुई फारच सुंदर दिसतेय. जुईने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. अत्यंत रेखीव जुईचे हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कॅप्शनमध्ये तिने, शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता मी कशी दिसते?, यासाठी मी काही सेल्फी शेअर करत आहे. कदाचित हे फोटो मी डिलीट करेन किंवा नक्कीच डिलीट करेन! तो पर्यंत फॉलो करत राहा आणि बघत राहा 'ठरलं तर मग'. असं म्हटलं आहे.

जुईने मेकअप सर्जरी केली आहे. जुईचा लूक आता बदलला आहे. सोशल मीडियावर जुईच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच जुईला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यानचे फोटो तिने पोस्ट केले होते. जुई कायम तिच्या चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते. जुई सध्या 'ठरलं तर मग काय' या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दरम्यान सध्या जुईने आजारपणासाठी ब्रेक घेतला असून लवकरच जुई मालिकेत दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT