Tharala Tar Mag! TRP Rating  Saam TV
मनोरंजन बातम्या

Tharla Tar Mag TRP: 'ठरलं तर मग'ची TRP मध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी: जुई गडकरीसह मालिकेच्या टीमचा जल्लोष

Jui Gadkari Video: 'ठरलं तर मग' मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या सोशल मीडियावर सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Tharal Tar Mag Marathi Serial Created History:

मराठी मालिकांच्या TRP चे आकडे नुकतेच समोर आले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून 'ठरलं तर मग', 'आई कुठे काय करते' आणि 'प्रेमाची गोष्ट' या मालिकांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. रेकॉर्डब्रेक TRP मिळवून 'ठरलं तर मग' मालिकेने बाजी मारली आहे.

'ठरलं तर मग' मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या सोशल मीडियावर सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मालिकेतील कलाकारांसह क्रू मेंबर्स देखील धमाल करताना दिसत आहेत.

दर गुरुवारी मालिकांच्या TRPची यादी जाहीर करण्यात येते. गेले सलग तीन आठवडे 'ठरलं तर मग' ही मालिका TRP रेटिंगमध्ये टॉपला आहे. जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांच्या या मालिकेने TRP रेटिंगमध्ये बाजी मारली नसून सर्वांत जास्त रेटिंग्स देखील मिळवले आहेत.

गेल्या अनेक महिन्यांपासून कोणत्याही मालिकेने रेटिंगमध्ये ७ चा आकडा पार केला नव्हता. पण या आठवड्यात 'ठरलं तर मग' मालिकेने ७.४ TRP रेटिंग मिळवले आहे. या रेकॉर्डब्रेकिंग TRP नंतर या मालिकेच्या टीमने दमदार सेलिब्रेशन केले आहे.

जुई गडकरीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये मालिकेची संपूर्ण टीम 'झिंगाट' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 'ठरलं तर मग'च्या टीमने ७.४ लिहिलेला केक कट करून त्यांचा आनंद साजरा केला. जुई गडकरीने हा व्हिडीओ तिच्या सेल्फी कॅमेऱ्यामध्ये शूट केला आहे. (Latest Entertainment News)

जुई गडकरीने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आज की, 'जी टीम एकत्र आनंद साजरा करते ती दीर्घकाळपर्यंत एकत्र राहते. आज आम्ही ७.४ चा आकडा गाठला आहे. आणि हो आम्ही हे यश मिळविण्यासाठी खुप मेहनत घेतली आहे. देनेवाला जब भी देता देता छप्पर फाडके! अभिनंदन टीम!' (A team that celebrates together stays together!!! Today we touched 7.4!!!!!! And yes we have worked very very hard to touch this mark!!!!!! Denewala jab bhi deta deta chhapar faadke! Kudos to team)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT