Thalapathy Vijay makes his grand Instagram debut Instagram/ @actorvijay
मनोरंजन बातम्या

Thalapathy Vijay On Instagram: नाद करा पण आमचा कुठं... थलपती विजयचे Instagram वर पदार्पण; अवघ्या तासातच मिलियनच्या घरात चाहते...

दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजय सोशल मीडियापासून दूर होता. पण नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवरही डेब्यू केला आहे.

Chetan Bodke

Thalapathy Vijay Instagram Debut: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजय सोशल (Thalapathy Vijay) मीडियापासून दूर होता. पण नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवरही (Instagram) डेब्यू केला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर (Social Media Debue) पदार्पण करताच त्याच्या फोलोवर्सच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. थलपथी विजयने 3 एप्रिल रोजी सोशल मीडियावर पदार्पण करताच एक पोस्ट पोस्ट केली होती.

सध्या त्याच्या पोस्टची चर्चा फक्त सोशल मीडियावरच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत (Tollywood) सर्वत्र होत आहे. थलपती विजयच्या या पोस्टला काही तासांतच चार लाखांहून अधिक लाईक्स आणि साडेचार लाखांहून अधिक कमेंट्स मिळाल्या. थलपथी विजयचे इंस्टाग्रामवर ४ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. इतकंच नाही तर थलपथी विजयने सोशल मीडियावर पदार्पण करताच अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने लगेचच त्याला फॉलो केले. थलपथी विजयने ‘actorvijay’ या नावाने सोशल मीडियावर एन्ट्री केली आहे.

सोशल मीडियावर त्याने एन्ट्री करताच ‘लिओ’ चित्रपटाच्या सेटवरील स्वतःचा एक फोटो शेअर केला. फोटोमध्ये थलपथी विजय ‘सॉल्ट अँड पेपर’ लूकमध्ये दिसत आहे. त्या लूकची सध्या सर्वत्रच चर्चा होत असून तो खूपच सुंदर दिसत आहे. थलपथी विजयने हा फोटो शेअर करत ‘हॅलो नानबाज अँड ननबीज’ असा संदेश चाहत्यांना लिहिला.

थलपतीने सोशल मीडियावर एन्ट्री करताच अवघ्या काही तासातच थलपथी विजयचे १० लाखांहून अधिक फॉलोअर्स होते, जे आतापर्यंत भारतात कोणत्याही सेलिब्रिटीच्या इंस्टाग्राम हँडलवर झाले नाही. हा स्वतःच त्याने एक विक्रम मोडित काढला आहे.

थलपथी विजयची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव करण्यात येत आहे. थलपथी विजयच्या सोशल मीडिया एन्ट्रीबद्दल सर्वांनी त्याचे केवळ अभिनंदनच नाही तर त्याचे स्वागतही केले. थलपथी विजयची ही पोस्ट काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाली. थलपथी विजय अनेक दिवसांपासून ट्विटर आणि फेसबुकवर असल्याची माहिती आहे, मात्र तो इन्स्टाग्रामपासून दूर होता. पण आता तो इंस्टाग्रामवरही चाहत्यांशी कनेक्ट झाला आहे.

थलपथी विजयची गणना तमिळमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये केली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो एका चित्रपटासाठी १२० ते १५० कोटी रुपये इतके मानधन आकारतो. थलपथी विजयने वयाच्या १० व्या वर्षी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि वयाच्या १८ व्या वर्षी चित्रपटात पहिली मुख्य भूमिका साकारली.

थलपथी विजयचे केवळ दक्षिणेतच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही प्रचंड चाहते आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, थलपथी विजयची एकूण संपत्ती 445 कोटी रुपये इतकी आहे. थलपथी विजयने ‘वारीसू’ चित्रपटासाठी १५० कोटी रुपये इतके मानधन आकारले.

थलपथी विजयच्या वर्कफ्रंट बद्दल तर, तो सध्या ‘लिओ’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट लोकेश कनगराज दिग्दर्शित करत असून हा चित्रपट LCU युनिव्हर्सचा एक मोठा आणि महत्वाचा एक भाग आहे. हा चित्रपट १९ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात संजय दत्तही दिसणार असून त्याची प्रमुख भूमिका असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT