Sachin Gokhale And Asavari Mehendale Wedding Photos  Instagram
मनोरंजन बातम्या

Sachin Gokhale Wedding: 'ठरलं तर मग' मालिकेच्या दिग्दर्शकाने उरकलं गुपचूप लग्न; अभिनेत्रीने फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

Sachin Gokhale News: 'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांनी नुकतीच लग्नगाठ बांधल्याचे वृत्त समोर येत आहे.

Chetan Bodke

Sachin Gokhale And Asavari Mehendale Wedding

सध्या मराठी टेलिव्हिजन सृष्टीमध्ये स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसापासूनच ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली असून कायमच टीआरपी चार्टमध्ये या मालिकेचीच प्रेक्षकांमध्ये चर्चा पाहायला मिळत आहे.

सध्या ह्या मालिकेच्या टीममधून एक 'गुड न्यूज' येत आहे. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांनी नुकतीच लग्नगाठ बांधल्याचे वृत्त समोर येत आहे. नुकताच त्यांचा विवाहसोहळा पार पडला असून “आयुष्याची नवी सुरुवात” असं कॅप्शन देत अभिनेत्याने लग्नाचे फोटो शेअर केले. (Tv Serial)

दिग्दर्शक सचिन गोखलेच्या लग्नाचे वृत्त अभिनेत्री प्रियांका तेंडोलकरने दिली आहे. दिग्दर्शक सचिन गोखले यांनी आसावरी मेहेंदळे यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. लग्नाचा फोटो शेअर करत तिने नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनीही दिग्दर्शकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Social Media)

Sachin Gokhale And Asavari Mehendale Wedding Photos

दिग्दर्शक सचिन गोखले ह्यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘ठरलं तर मग’ मालिकेपूर्वी अनेक मालिकांचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. ‘असं माहेर नको ग बाई’ ह्या मालिकेच्या दिग्दर्शनासाठी सचिन गोखले ह्यांना सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT