TRP Rating Of Marathi Serial
TRP Rating Of Marathi Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Serial TRP Chart: टीआरपीच्या दुनियेत याच मालिकेचे राज्य; दोन आठवड्यात गमावलेली रेटिंग एका आठवड्यात केली वसुल...

Chetan Bodke

TRP Rating Marathi Serial: टेलिव्हिजन सिरीयल चॅनेलचा लेटेस्ट टीआरपी रिपोर्ट जाहीर झाला आहे. या आठवड्यात टीआरपीच्या खेळात नुकतीच प्रदर्शित झालेली ‘ठरलं तर मग’ या मालिकेने बाजी मारली आहे. तर त्यानंतर सर्वाधिक पाहिलेल्या मालिकेत ‘आई कुठे काय करते’ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या काही दिवसांपुर्वीच स्टार प्रवाहवर प्रदर्शित झाली होती. प्रदर्शित झाल्यापासून अनेक सिरियल्सला मागे सारत, टीआरपीमध्ये पहिल्या नंबरवर आली आहे. मालिकेत मुख्य भूमिकेत जुई गडकरी आणि अमित भानुशाली असून पती-पत्नीची एक वेगळीच लव्ह स्टोरी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

‘आई कुठे काय करते’ ही मालिका टीआरपीमध्ये दुसऱ्या स्थानावर असून सध्या मालिकेतील अनेक पात्र कमालीचे चर्चेत आहे. दिवसेंदिवस मालिकेमध्ये वेगवेगळा ट्वीस्ट प्रेक्षकांना अनुभवायला मिळत असताना, आता आशुतोष केळकरच्या बहिणीची मालिकेत एन्ट्री होणार आहे. सध्या ही मालिका टीआरपीच्या चार्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

तर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सध्या टीआरपीच्या चार्टमध्ये तिसऱ्या रँकमध्ये आहे. मालिकेत आलेल्या ट्विस्टने मालिकेचा टीआरपी घसरून दिलेला नाही. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात ही मालिका यशस्वी ठरत आहे. सोबतच मालिकेतील अनेक पात्रांवर देखील भरभरून प्रेम आणि विश्वास दाखवत आहे.

‘रंग माझा वेगळा’ ही मालिका टीआरपीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या आठवड्यात ही मालिका पाचव्या क्रमांकावर होती. ही मालिका सध्या १६ वर्ष पुढे गेली आहे. त्यामुळे मालिकेतील प्लॉट प्रेक्षकांना रंजक वाटत आहे असून त्याचाच परिणाम निर्मात्यांना मालिकेच्या टीआरपीवर बसलेला दिसत आहे.

अभिजित खांडकेकर आणि प्रिया मराठे मुख्य भूमिकेत असलेल्या ‘तुझेच मी गीत आहे’ ही मालिका गेल्या आठवड्यात चौथ्या क्रमांकावर होती. आणि या आठवड्यात देखील ही मलिका पाचव्या क्रमांकावर आहे.

सहाव्या स्थानावर ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका आहे. तर सातव्या स्थानावर ‘आई कुठे काय करते’चा गेल्या आठवड्यातील महाएपिसोड आहे. तर आठव्या स्थानावर ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका आहे. तर गेल्या आठवड्यातच निरोप घेतलेलली ‘स्वाभिमान शोध अस्तित्वाचा’ ही मालिका नवव्या स्थानावर आहे. या सगळ्या मालिकांना ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांचा सर्वाधिक कल आहे.

यावर्षातील अठराव्या आठवड्यातील टीआरपी रॅकिंग २९ एप्रिल ते ०५ मे पर्यंतचा रेटिंग यावेळी काउंट करण्यात आला आहे. या आठवड्यातील रेटिंग चार्ट पाहिला तर पहिल्या पंधरा मालिकेत स्टार प्रवाहावरीलच मालिका आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : बारामतीत सुप्रिया सुळेंची 'मोहब्बत की दुकान'; सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी

Lok Sabha Election : काँग्रेसचा मोदींवर पलटवार; पाकिस्तान, बिर्याणीचा संबंध जोडत गंभीर आरोप

Expensive country : जगातील ५ सर्वात महागडे देश; राहणे-खाणे आणि फिरायचा खर्च पाहून डोळे फिरतील

Live Breaking News: मुख्यमंत्रीपदाच्या मोहासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Thane Lok Sabha: कोण होणार ठाण्याचा खासदार? ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने

SCROLL FOR NEXT