Aai Kuthe Kay Karte Latest Update Instagram
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karte: यशच्या साखरपुड्यामध्ये संजनाचं नवं कारस्थान; अरुंधतीमुळे 'हा' डाव फसणार

Aai Kuthe Kay Karte Latest Update: अरुंधतीचा मुलगा यशच्या साखरपुड्यामध्ये संजनाने रचलेला डाव अरुंधती मोडताना दिसते.

Chetan Bodke

Aai Kuthe Kay Karte Serial Update

टीआरपीच्या शर्यतीमध्ये अरुंधती आणि अनिरुद्धच्या 'आई कुठे काय करते' मालिकेची नेहमीच चर्चा होताना दिसते. गेल्या अनेक दिवसांपासून चुकलेलं कथानक आणि प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ही मालिका टीआरपी यादीमध्ये खूप मागे पडलेली दिसत आहे.

सध्या मालिकेमध्ये नवा ट्वीस्ट आलेला पाहायला मिळत आहे. नुकतंच निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक नवा प्रोमो शेअर केलेला आहे. या शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये, अरुंधतीचा मुलगा यशच्या साखरपुड्यामध्ये संजनाने रचलेला डाव अरुंधती मोडताना दिसते. (Tv Serial)

स्टार प्रवाहाच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर त्यांनी मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, यशचा साखरपुडा असतो. साखरपुड्यातील अंगठी संजनाने चोरलेली असते. ही अंगठी चोरताना अरुंधती पाहाते. (Social Media)

अंगठी मागितल्यानंतर अरुंधती संजनाच्या कपाटातून आणून देताना दिसते. तुझ्याकडे अंगठी असताना, तू का आणून दिली नाहीस, असं कांचनताई संजनाला बोलतात. यावर संजना अरुंधतीला, तु माझ्या कपाटाला मला न विचारता कसं काय हात लावला. असं बोलते. (Star Pravah)

अरुंधतीच्या ह्या कृत्यामुळे संजनाचा डाव फसतो. अरुंधती आणि संजना यांच्यामध्ये कायमच आपआपसात वाद होताना आपण पाहिले. संजनाचं हे नवं कट कारस्थान काय असणार ? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत्या १७ जानेवारीलाच मिळणार आहे. इशाच्या लग्नाप्रमाणेच संजना यशच्या लग्नातही काय काय कट कारस्थान रचणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे. यश आरोहीच्या लग्नात सुरुवातीपासूनच खूप अडथळे येताना दिसत आहेत. त्यामुळे आता पुढे या दोघांचे लग्न होणार का हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असल्याचे दिसत आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकची घटना ताजी असताना संभाजीनगरात टेम्पो विहिरीत कोसळला|VIDEO

Maharashtra Live News Update: जय पवार यांचा बारामतीत जनता दरबार सुरू

Belly Fat Tips: सुटलेलं पोट कमी करायचंय? हे पदार्थ खाणं आत्ताच टाळा

Shocking: लग्नाच्या हॉलमध्ये 'गंदाकाम', ४१ खोल्यांमध्ये ८० तरुण अन् तरुणींना नको त्या अवस्थेत पकडलं; पोलिसांनी छापा टाकताच...

Sudden Weight Gain: कमी खाऊनही वजन वेगाने वाढतंय? या ५ गोष्टी असू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT