MC Square wins Hustle 2.0.  Instagram @fremantleindia
मनोरंजन बातम्या

MC Square wins Hustle 2.0. : एमसी स्क्वेअर ठरला हसल 2.0'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता

अभिषेक भारतीय हिप-हॉप कम्युनिटी शोधत असलेला पुढील रॅपर असल्याचे सिद्ध झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hustle 2.0. Grand Finale News: रॅप रिअॅलिटी शो 'हसल 2.0'ला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. या शोचा नुकताच ग्रँड फिनाले फार पडला आहे. या शोच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता अभिषेक बैसला उर्फ ​​एमसी स्क्वेअरमध्ये ठरला आहे. पॅराडॉक्स उर्फ ​​तनिष्क सिंग आणि मुंबईकर नाझ उर्फ ​​निहार होडावडेकर यांना उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले.

स्क्वॉड बॉस डी एमसी, ईपीआर, डिनो जेम्स आणि किंग यांनी देखील आपापल्या टीममधील स्पर्धकांसोबत ग्रँड फिनालेमध्ये परफॉर्म केला. प्रसिद्ध रॅपर इक्का सिंग स्पेशल गेस्ट म्हणून ग्रँड फिनालेमध्ये उपस्थित राहिला होता.

एमसी स्क्वेअर विजयानंतर त्याच्या भावना व्यक्त करत म्हणाला, “स्टार होण्याचे माझे लहानपणापासून स्वप्न होते आणि आता मी अभिमानाने माझ्या आईला सांगू शकतो की तिचा मुलगा खरोखरच एक स्टार आहे. एमटीव्ही 'हसल 2.0'ला धन्यवाद देतो, त्यांनी माझी स्वप्ने प्रत्यक्षात आणली आहेत. बादशाह सर तसेच सर्व स्पर्धकांचे प्रेम आणि पाठिंबा यामुळे मला सतत प्रेरणा मिळत राहिली. मी हा विजय संपूर्ण रॅप कम्युनिटीला समर्पित करतो.”

परीक्षक बादशाह देखील एमसी स्क्वेअरच्या विजयावर मत व्यक्त करत म्हणाला की, "एमटीव्ही 'हसल 2.0'ने नवीन कलाकारांना या मंचावर आणून रॅप म्युसिक आणि रिअॅलिटी टेलिव्हिजनचा स्तर वाढवला आहे. आमच्या सर्व प्रतिभावान स्पर्धकांनी त्यांच्या कथांनी आणि कौशल्याने मला प्रत्येक आठवड्यात आश्चर्यचकित केले. अभिषेक भारतीय हिप-हॉप कम्युनिटी शोधत असलेला पुढील रॅपर असल्याचे सिद्ध झाले आहे आणि मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे!” (TV)

रॅप व्यतिरिक्त एमटीव्ही 'हसल 2.0'च्या स्पर्धकांनी घरगुती हिंसाचार, मानसिक आरोग्य आणि वैयक्तिक अनुभव यासारख्या विषयांवर या कार्यक्रमात प्रकाश टाकण्यात आला आहे. शोमधील बहुतेक रॅप सोशल मीडिया आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर चांगले गाजले आहेत. (Social Media)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT