Swanandi And Ashish Get Engaged Instagram
मनोरंजन बातम्या

Swanandi And Ashish Get Engaged: ‘आमचं ठरलंय’ म्हणत दिली प्रेमाची कबुली, दोन दिवसांतच स्वानंदी- आशिषनं साखरपुडाही उरकला

Chetan Bodke

Swanandi And Ashish Engagement News: टेलिव्हिजन अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रेमाची कबुली दिली. नुकताच या जोडीचा साखरपुडा झाला असून त्यांच्यावर युजर्सने कौतुकाचा वर्षाव केला. दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली दिल्यापासून त्यांच्या साखरपुड्याची चर्चा रंगली होती. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत साखरपुड्याची माहिती दिली आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी स्वानंदीने त्यांच्या साखरपुड्याची जय्यद तयारी सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान दोघांचेही रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आज स्वानंदीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत साखरपुडा झाल्याची माहिती दिली. यावेळी शेअर केलेल्या फोटोला स्वानंदीने कॅप्शन दिले की, “…आणि आम्ही बंधनात अडकलो”, स्वानंदी आणि आशिषचा हा साखरपुड्यातील फोटो बराच चर्चेत आला आहे.

दोघांच्याही लूक विषयी बोलायचे तर, साखरपुडा समारंभात स्वानंदीने पेस्टल पिस्ता रंगाची साडी परिधान केली होती. तर स्वानंदीच्या साडीला मॅचिंग कलर असलेला कुर्ता आशिषने घातला होता. यावेळी स्वानंदी आणि आशिषच्या फोटोवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला होता. समीर चौघुले, अमृता खानविलकर, नम्रता संभेराव, शरयू दाते, श्रेया बुगडे, यशोमन आपटेसह अनेक सेलिब्रिटी मंडळींनी कमेंट करत दोघांचेही कौतुक केलेय.

अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने २० जुलैला रिलेशनमध्ये असल्याची घोषणा केली होती. तिने सोशल मीडियावर जाहीर करताच तिच्या चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटी मित्रांनी ही या स्वीट कपलला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आमच्या दोघांचं ठरलंय’म्हणत स्वानंदीने त्यांचं लग्न ठरल्याची माहिती दिली होती.

स्वानंदीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर.. स्वानंदी ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून प्रकाशझोतात आली होती. सोबतच गेल्या काही दिवसांपूर्वी स्वानंदी ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई?’ या मराठी टेलिव्हिजन सिरीयलमध्ये ती झळकली होती.

स्वानंदी सिनेअभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची लेक आहे.

तर आशिष कुलकर्णीबद्दल बोलायचे तर, आशिष एक गायक- संगीतकार असून तो Indian Idol च्या 12 व्या सीझनमध्ये सहभागी होता. आशिष कुलकर्णी स्वत:चे लाईव्ह शोज सुद्धा करतो. आशिष सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध गायक असून त्याचे सातासमुद्रापार गाण्यांचे कार्यक्रम देखील होत असतात.

Indian Idol 12 मधून आशिषला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली असून तो मुळचा पुणेरी आहे. आशिषचं स्वत:चं युट्यूब चॅनल असून तो त्यावर त्याचे अनेक गाणे देखील शेअर करत असतो. Indian Idol 12 मधून आशिषला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली. त्या मंचावरील आशिषचे अनेक गाणे चाहत्यांच्या पसंदीस उतरले होते. आशिषच्या गाण्यांवर जगभरातील चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. आशिष एक गीतकार असून त्याने अनेक हिंदी गाण्यांसोबत मराठी गाणे देखील गायले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wheat Bugs : गव्हासह डब्ब्यात 'या' गोष्टी मिक्स केल्यास लागणार नाहीत किडे

PM Narendra Modi : मोदींचा महाराष्ट्र दौरा; वर्ध्यातून संबोधित करणार

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचं अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT