Actress Sukanya Kalan Got Engaged Instagram
मनोरंजन बातम्या

Sukanya Kalan Engagement: आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Chetan Bodke

Actress Sukanya Kalan Got Engaged

सध्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जोरदार लगीनघाई सुरू असल्याचं दिसत आहे. मुग्धा वैश्यमपायन- प्रथमेश लघाटे, स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी, पूजा सावंत-सिद्धेश चव्हाण या लोकप्रिय जोडप्यानंतर आता अभिनेत्री सुकन्या काळणचा साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे. सुकन्या काळण सचिन पिळगावकरांच्या ‘एकापेक्षा एक’ या लोकप्रिय रिॲलिटी डान्स शोच्या माध्यमातून ती लोकप्रिय झाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नृत्यांगना म्हणून प्रसिद्ध झालेली सुकन्या अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यावेळी तिच्या साखरपुड्याला अभिनेता आणि विनोदवीर कुशल बद्रिकेनेही उपस्थिती लावली होती.

कुशलने त्याच्या पत्नीसोबत उपस्थिती लावली होती. सुकन्याने इन्स्टाग्रामवर अनेकांनी शेअर केलेली स्टोरी रिशेअर केलेली आहे. सुकन्याच्या होणाऱ्या पतीचे नाव रोशन असे असून ते गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. यावेळी सुकन्याने साखरपुड्यामध्ये लाल रंगाची शिमरी साडी, तर रोशनने ऑफ व्हाईट शेरवानी घातली होती. (Marathi Actress)

सध्या ह्या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. सुकन्या-रोशन लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत. तिच्या कामाविषयी सांगायचे तर, ‘एकापेक्षा एक’ या लोकप्रिय रिॲलिटी डान्स शोनंतर अनेक लोकप्रिय मालिकेमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सध्या सुकन्या ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नाटकामध्ये मुख्य भूमिकेमध्ये सुकन्यासोबत वैभव मांगले, भार्गवी चिरमुले, निमिष कुलकर्णी आणि विकास चव्हाण ही स्टारकास्ट आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

SCROLL FOR NEXT