Nupur Alankar Rescued From Kedarnath By Helicopter Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nupur Alankar Rescued: अभिनय सोडून संन्यासी झालेली नुपूर अलंकार केदारनाथमध्ये अडकली, व्हिडिओ शेअर करुन सांगितली थरारक घटना

Nupur Alankar Badrinath Viral Video: नुपूर अलंकार सध्या केदारनाथ बाबाच्या दर्शनाला गेली असून ती तिकडेच अडकली आहे. नुकताच अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत तेथील किस्सा शेअर केला.

Chetan Bodke

Nupur Alankar Rescued From Kedarnath By Helicopter: आपल्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या अभिनेत्री नुपूर अलंकारने अचानक अभिनयसृष्टी सोडण्याचा विचार केला आहे. अभिनयातून संन्यास घेणाऱ्या नुपूर अलंकार सध्या अनेक धार्मिक स्थळांना भेट देत असल्याचे दिसत आहे.

अभिनेत्री सध्या देवदर्शन करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत केदारनाथ बाबाच्या दर्शनाला गेली असल्याची माहिती दिली. मात्र यावेळी ही अभिनेत्री केदारनाथ बाबाच्या दर्शनाला गेली असून तिथेच अडकली आहे. ज्यानंतर तिला आणि बाकीच्या टिमला हेलिकॉप्टरने वाचवण्यात आले.

सध्या नूपुर केदारनाथ बाबाच्या दर्शनाला गेली असून ती दर्शनाला जात असलेल्या रस्त्यातच दरड कोसळली असून ती रस्त्यात अडकलेली आहे. दरम्यान, चाहत्यांना याविषयी माहिती देत नूपुरने तिचा आणि तिच्या सोबत असलेल्या टीमचा बचाव करत असल्याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी नुपूरने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत तिच्यासोबत घडलेली घटना शेअर केली.

पावसाळ्यात अनेकदा त्या रस्त्यांवर दरड कोसळणे, रस्ता खचून जाणे आणि इत्यादी अशा अनेक घटना केदारनाथ, बद्रिनाथच्या रस्त्यांवर घडत असतात. अशाच या एका घटनेत अभिनेत्री अडकली आहे.

याबद्दलची माहिती अभिनेत्रीने एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली आहे. अभिनेत्री व्हिडीओत सांगते, केदारनाथ बाबांचं दर्शन घेतलं आणि परतत असताना वाटेतच मुसळधार पाऊस पडत असल्याने दरड कोसळली. त्यात अभिनेत्रीसोबत इतरही प्रवाशी अडकले होते.

अभिनेत्रीच्या मदतीला तेथील कर्मचारी आले असून अडकलेल्या सर्व प्रवाशांना त्यांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुटका केली. केदारनाथमध्ये एक डिग्री तापमान असून देवाच्या कृपेने आम्ही सर्व प्रवासी वाचल्याची माहिती तिने व्हिडिओत दिली.

नुपूर अलंकारने 'शक्तिमान', 'घर की लक्ष्मी बेटियां' आणि 'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' सारख्या अनेक मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. पण २०२२ मध्ये नुपूरने अभिनय क्षेत्राला राम राम ठोकून संन्यास घेतला. आता ती फक्त देवाच्या भक्तीत मग्न राहते. देशभरातील मंदिरांमध्ये ती देवदर्शन करत असून तिने त्यासाठी तिचं घरदारही सोडून दिलंय. नुपूर मुंबई सोडून हिमालयात गेल्यापासून तिचा धार्मिक प्रवास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

SCROLL FOR NEXT