Anushka Sen Buy New Home Instagram
मनोरंजन बातम्या

Anushka Sen Buy New Home: ‘बालवीर’ फेम अभिनेत्रीने साकार केलं स्वप्न; वयाच्या २१ व्या वर्षीच कोट्यवधींचं घर खरेदी

Anushka Sen News: ‘बालवीर’ फेम अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर आपल्या नव्या घराचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

Chetan Bodke

Anushka Sen Buy New Home

लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री अनुष्का सेन कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजामध्ये फोटो शेअर करत असते. नुकतंच अभिनेत्रीने चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एक 'गुड न्यूज' दिली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर आपल्या नव्या घराचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. मुख्य बाब म्हणजे अभिनेत्रीने अवघ्या वयाच्या २१ व्या वर्षी नवं घर खरेदी केले आहे. (Actress)

अभिनेत्रीने "सेन कुटुंबीयांचे नवे घर, आणखी एक स्वप्न पूर्ण झालेय." असं कॅप्शन देत नव्या घराचे फोटो शेअर केले. यावेळी तिच्या आई वडीलही तिच्या फोटोंमध्ये दिसत आहेत. अभिनेत्रीने मुंबईमध्ये घर खरेदी केले असून तिने नवे घर निसर्गाच्या कुशीत घेतलेले दिसत आहे. अभिनेत्रीने नवं घर एका अलिशान सोसायटीमध्ये घेतले असून इतक्या लहान वयात तिने स्वत:च्या मेहनतीवर नवीन घर खरेदी केल्यामुळे तिचे चाहते कौतुक करीत आहेत. (Tv Serial)

अनुष्काने २००९ मध्ये 'यहां मै घर घर खेली' मालिकेतून बालकलाकार म्हणून टेलिव्हिजन सृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनुष्काने 'बालवीर' मालिकेत मेहेर नावाचे पात्र साकारले. या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. अभिनेत्रीने या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. अभिनेत्री अनुष्का सेन कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर ३९.६ मिलियनच्या जवळपास चाहतावर्ग आहे. अनुष्काने हा आकडा वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी गाठला आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत ट्विस्ट! गुलाल उधळला पण निकाल कोर्टात, सोलापूरनंतर धुळ्यातील विजयाने भाजपचं टेन्शन वाढलं

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये ताराच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याची सुटका

Men's Day: 'होय पुरूषही रडतात...', बोरिवली स्टेशनवर ढसाढसा रडणारा तो तरुण कोण? VIDEO ची होतेय चर्चा

Relationship Tips: तिशीत Single आहात? परफेक्ट पार्टनर शोधताय? मग 'या' सिक्रेट टिप्स ठरतील फायदेशीर

Winter Ear Care Tips: थंडीच्या दिवसात कानांची काळजी कशी घ्यावी?

SCROLL FOR NEXT