Famous Actor Death saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्व शोकसागरात

Actor Passed Away : मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे अवघ्या २० व्या वर्षी निधन झाले. सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मनोरंजन विश्वावर शोककळा

प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन

वयाच्या २० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. टिव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे, ज्यामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. 'बॉईज व्हायब' या रिॲलिटी शोमधून लोकप्रियता मिळवलेला तरुण अभिनेता जॉर्ज फुमहिरुन (Jorjay Phumhirun) याचे निधन झाले आहे. अभिनेत्याच्या अचानक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

e24bollywood च्या वृत्तानुसार, अभिनेता जॉर्ज फुमहिरुन याने अवघ्या वयाच्या २० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या निधनाची बातमी समजताच कलाकार आणि चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्यावर श्रद्धांजली वाहत आहेत.

जॉर्ज फुमहिरुनने तरुण वयातच स्वतःची ओळख निर्माण केली होती. 'बॉईज व्हायब'मधील त्याच्या प्रभावी अभिनयाने तो प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. त्याचे निरागस हास्य, उत्कृष्ट अभिनय आणि सकारात्मक स्वभावामुळे त्याला अल्पावधीतच मोठा चाहतावर्ग मिळाला होता. म्हणूनच त्याच्या निधनाची बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांना विश्वासच बसत नाही.अद्याप अभिनेत्याच्या मृत्यूच्या कारणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्याच्या कुटुंबाने किंवा त्याच्या टीमनेही या प्रकरणी सविस्तर निवेदन जारी केलेले नाही.

जॉर्जचे अनेक जुने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जॉर्ज फुमहिरुनचा जन्म १५ ऑक्टोबर २००५ रोजी झाला. 'बॉईज व्हायब द प्रोजेक्ट'या शोमुळे त्याला मोठी ओळख मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चाणक्यांच्या 'या' 7 गोष्टी कधीही विसरू नका

दक्षिणेत वारं फिरलं,भाजपचं टेन्शन वाढलं! इंडिया आघाडीत विजय यांच्या पक्षाची एन्ट्री

खरीपनंतर रब्बी हंगामसुद्धा संकटात; मुंबईसह निम्म्या राज्यातून मोसमी पावसाची माघार

संसदीय समित्यांमध्ये मोठा फेरबदल;महाराष्ट्रातील ४० खासदारांना १५ समित्यांवर संधी, सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी, वाचा संपूर्ण यादी

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं; राहुल गांधींनी केलं ट्विट

SCROLL FOR NEXT