Ravindar Chandrasekaran Get Arrested  Instagram @ravindarchandrasekaran
मनोरंजन बातम्या

Film Producer Arrested: साऊथच्या सुप्रसिद्ध निर्मात्याला फसवणुकीच्या आरोपीखाली अटक, लग्नाचे फोटो झाले होते व्हायरल

Ravindar Chandrasekaran: रविंदर एक प्रतिष्ठित निर्मिती संस्था लिब्रा प्रॉडक्शन चालवतात.

Pooja Dange

Ravindar Chandrasekaran Cheated Businessman:

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य निर्माते रविंदर चंद्रशेखरन यांना सेंट्रल क्राईम ब्रँच अटक केली आहे. अहवालानुसार निर्मात्यांवर १५.८३ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रविंदर एक प्रतिष्ठित निर्मिती संस्था लिब्रा प्रॉडक्शन चालवतात. त्यामुळे यांच्या अटकेने सगळ्यांचा भुवया उंचावल्या आहेत.

अहवालात नमूद केल्यानुसार, रविंदर यांनी खोटी कागदपत्र तयार करून व्यावसायिक बालाजी फोर्ड यांची फसवणूक केली आहे. रविंदर यांनी बालाजी यांना घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव मांडला या व्यवसायातून खूप नफा मिळेल असेही त्यांनी त्यांना सांगितले.

निर्माते रविंदर आणि व्यावसायिक बालाजी यांनी 17 सप्टेंबर 2022 रोजी 15 कोटी रुपयांचा परस्पर करार केला. अहवालानुसार, रविंदर दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले.

बालाजी फोर्ड यांनी रविंदरविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली. तसेच चेन्नई सेंट्रल क्राइम ब्रँचकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून कसून तपास केला.

पोलीस तपासादरम्यान रविंदर यांनी बालाजीकडून इन्व्हेस्टमेंट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी निर्मात्यालाही ताब्यात घेतले आहे. आर्थिक अनियमितता आणि ५० कोटींच्या कथित फसवणुकीचा तपास सुरू आहे. (Latest Entertainment News)

रविंदर चंद्रशेखरन हे तमिळ चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहेत . गेल्या वर्षी, त्यांनी टेलिव्हिजन अभिनेत्री महालक्ष्मीशी लग्न केल्यामुळे ते चर्चेत आले होते. रविंदरचे नाव वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकवेळा ते वादात सापडला आहेत.

नुकताच त्यांनी पत्नी महालक्ष्मीसोबत लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. मे महिन्यात दोघे वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, रविंदरने सोशल मीडियावर एक गमतीशीर पोस्ट देऊन या खोट्या बातम्यांना पूर्णविराम दिला. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT