Tamannah Bhatia And Vijay Verma News Instagram
मनोरंजन बातम्या

Tamannah Bhatia : तमन्ना भाटियाने विजय वर्मासोबत केलेल्या इंटिमेट सीन्सची तुफान चर्चा; काय आहे कारण ?

Tamannaah Bhatia Love Making Scene : 'स्त्री २' चित्रपटातील 'आज की रात' गाण्यात तमन्नाचा तुम्हाला कातिलाना अंदाज पाहायला मिळेल. सध्या तिच्या कातिलाना अंदाजाची चर्चा होत असून तिने यापूर्वीही काही चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन्स दिलेले आहे.

Chetan Bodke

अभिनेत्री तमन्ना भाटियासाठी २०२४ हे वर्ष एकदम खास ठरलं आहे. लकरच तमन्ना 'स्त्री २' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या चित्रपटातील तिच्या आयटम साँगची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. चित्रपटातील 'आज की रात' गाण्यात तमन्नाचा तुम्हाला कातिलाना अंदाज पाहायला मिळेल. सध्या तिच्या कातिलाना अंदाजाची चर्चा होत असून तिने यापूर्वीही काही चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन्स दिलेले आहे.

२०२३ मध्ये रिलीज झालेल्या 'लस्ट स्टोरीज २' चित्रपटामध्ये तमन्नाने विजय वर्मासोबत इंटिमेट सीन्स दिलेले आहेत. या सीन्सच्या शुटिंगबद्दल तमन्नाने एका मुलाखतीत सांगितले होते. 'न्यूज १८' ला दिलेल्या मुलाखतीत तमन्नाने सांगितले की, "चित्रपटातील इंटिमेंट सीन्सचं शुटिंग करताना विजय वर्माच माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ होता. शुटिंगवेळी अभिनेत्रीला वाईट वाटेल का याचा तो अधिक विचार करायचा. शुटिंगवेळी दोघंही कम्फर्टेबल असायला हवे, याची जबाबदारीही अभिनेत्यावर असते. एखाद्या अभिनेत्यासोबत काम करताना मला इतके सुरक्षित केव्हाच वाटले नव्हते."

'लस्ट स्टोरीज २'च्या प्रमोशनवेळी तमन्ना आणि विजयच्या अफेअरची चर्चा झाली होती. चर्चा चालू असताना दोघांनीही रिलेशनच्या चर्चांवर मौन बाळगले होते. विजयने एकदा मुलाखतीत सांगितले होते की, त्याने तमन्नाला 'लस्ट स्टोरीज २'नंतर डेट करायला सुरूवात केली होती. शिवाय, दोघं अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT