Kaavala Song Maliksha Varsion Saam TV
मनोरंजन बातम्या

RJ Malishka's Kaavala Version : कावालाचं मलिष्का व्हर्जन, गाणं ऐकून तुम्हीही म्हणाल, हा...कामाला या...या...या...!

Tamanna's Kaavala Song: कावाला या ट्रेंडिग गाण्याचे नविन व्हर्जन आणलं आहे.

Pooja Dange

RJ Malishka On Kaavala Song :

रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु याआधी चित्रपटातील कावाला गाणं खुप ट्रेंड करत आहे. कावाला या गाण्यावर तमन्ना भाटियाने डान्स केला आहे.

तमन्नाने या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. तिचे या गाण्यातील हूक्स स्टेपवर अनेक नेटकरी रील्स बनवत आहेत. तसेच या गाण्याचे वेगवेगळे व्हर्जन देखील येत आहेत. दरम्यान आरजे मलिष्काने तिचे व्हर्जन तयार केले आहे.

मलिक्षकाचं कावाला व्हर्जन

मलिष्का नेहमीच काहीतरी वेगळं आणि भन्नाट करत असते. यावेळी तिने कावाला या ट्रेंडिग गाण्याचे नविन व्हर्जन आणलं आहे. मलिष्काने तिच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. (Latest Entertainment News)

या व्हिडीओच्या सुरुवातीला मलिष्काने लिहिले आहे, 'तुमचा बॉस पावसाळ्याच्या दिवसात किंवा सोमवारी सकाळी.' त्यानंतर कावला या गाण्याचं तीच व्हर्जन सुरू होत. मलिष्काने कावा लय्याचं रूपांतर 'कामाला या'मध्ये केले आहे.

'कामाला या, कामाला या' म्हणत मलिष्काने यावर डान्स देखील केला आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेटकरी तिच्या या व्हिडीओ कमेंट करत तिचे कौतुक करत आहेत. तसेच तिला नवनवीन आयडिया देत आहेत.

काही वर्षांपूर्वी मलिष्काने मुंबईतील खड्ड्यांवर एक गाणे केले होते. ते गाणे खूप व्हायरल झाले होते. परंतु यामुळे तिला खूप त्रास देखील सहन करावा लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT