Jennifer Mistry Reveal Nattu Kaka Harassment Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jennifer Mistry Reveal Nattu Kaka Harassment: जेनिफरने पुन्हा एकदा केले निर्मात्यांवर आरोप, म्हणाली, छळ करत पैसे थकवले आणि...

Jennifer Mistry On Nattu Kaka: निर्माते सेटवरील सहकाऱ्यांसोबत कशाप्रकारे वागतात यावर जेनिफर मिस्त्रीने भाष्य केले आहे.

Chetan Bodke

Jennifer Mistry Bansiwal Talks About Nattu Kaka: जेनिफर मिस्त्री बन्सीवाल आणि मालिकेच्या टीमधील वाद काही संपण्याचे नाव घेत नाही. गेल्या काही दिवसांपुर्वी अभिनेत्रीने निर्माता असित मोदी, प्रकल्प प्रमुख सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्या विरोधात काही आरोप केले होते. मालिकेच्या निर्मात्यांविरोधात मोनिका भदोरिया आणि प्रिया आहुजा यांनी देखील काही आरोप केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा जेनिफर मेस्त्रीने निर्मात्यांवर काही आरोप लावले आहेत. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने सेटवरील सहकाऱ्यांसोबत निर्माते कशाप्रकारे वागतात यावर भाष्य केले आहे.

अभिनेत्रीने नुकतंच पिंकव्हिला या संकेतस्थळाला मुलाखत दिली आहे. यावेळी तिने कलाकारांचा सेटवरील संघर्ष, आपल्या विरोधात बोलणं आणि अशा अनेक गोष्टींबद्दल अभिनेत्रीने खुलाला केला. अभिनेत्री म्हणते, जेनिफरच्या लहान भावाचे निधन झाले असून त्याच्या आठवणीत अभिनेत्री भावूक झाली आहे. अभिनेत्री मोनिका भदौरिया आणि नट्टू काका म्हणजेच स्वर्गीय घनश्याम नायक यांनी असित कुमार यांच्या गैरवर्तनाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मला खूपच मदत केली. निर्मात्यांनी घनश्याम नायक यांना अर्थात नट्टू काकांना खूपच त्रास दिला.

नट्टू काकांचे निधन ३ ऑक्टोबर २०२१ रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर मालिकेत किरण भट्ट यांना नट्टू काकांची भूमिका साकारण्यासाठी दिली. घनश्याम नायक मालिकेत सुरूवातीपासूनच मालिकेचा एक महत्वाचा भाग म्हणून होते. त्यांची लोकप्रियता देखील चाहत्यांमध्ये आजही आहे.

याआधी एका मुलाखतीत मोनिका भदौरियाने देखील मालिकेच्या सेटवर घनश्याम नायक उर्फ ​​नट्टू काकांना कशाप्रकारे त्रास दिला जायचा याबद्दल सांगितले आहे. तिने शेअर केले होते की, सोहेलने घनश्याम नायक यांनाही शिवीगाळ केली होती. मालिकेच्या सेटवर कलाकारांना 'कुत्र्या'सारखी वागणूक दिली जात असल्याची माहिती अभिनेत्रीने दिली होती. सोबतच मोनिका भदौरियाने दिलेल्या माहितीप्रमाणे, पगारवाढीसाठी तिने जवळपास एक वर्षापेक्षा जास्त काळ संघर्श केला आहे.

निर्मात्यांनी अनेक कलाकारांचा छळ करत त्यांचे पेमेंट थांबवले होते. तो म्हणाला की राज अनडकट (टप्पू) आणि गुरचरण सिंग (रोशन सिंग सोढी) यांना अद्यापही त्यांचा पगार दिलेला नाही. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT