Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Saam Tv
मनोरंजन बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता...मध्ये होणार 'या' नवीन तारक मेहताची एन्ट्री

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोला अलविदा केलं आहे आणि आता तो या शोचा भाग नसेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : टीव्ही जगातील प्रसिद्ध नाव म्हणजे शैलेश लोढा(shailesh lodha). जो गेल्या १४ वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. शैलेश लोढा मालिकेच्या सुरुवातीपासून मेहता साहेबांच्या भूमिकेत दिसला आणि त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. पण काही महिन्यांपूर्वी अचानक बातमी आली की शैलेश लोढाने आता 'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या शोला अलविदा केलं आहे आणि आता तो या शोचा भाग नसेल. काही वेळातच या बातमीलाही दुजोरा मिळाला आणि आता या भूमिकेसाठी निर्मात्यांना नवीन चेहरा सापडल्याची माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीव्ही आणि चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेता राज पुरोहित आता नवीन मेहता साहेब बनणार आहे. राज 'बालिका वधू', 'जब हम तुम', 'लगी तुझसे लगन' यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये दिसला होता. याशिवाय त्याने 'ओह माय गॉड' सारख्या चित्रपटातही काम केले आहे. अभिनय विश्वातील राज पुरोहित एक प्रसिद्ध नाव आहे. आता तो टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दिसणार आहे. याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी या वृत्ताला दुजोरा मिळाला असून, लवकरच त्याच्या या शोमध्ये एन्ट्रीचा प्लान तयार करण्यात आला आहे.

अभिनेता आणि कवी शैलेश लोढा याने शो का सोडला? असा सवाल सर्व जण त्याला विचारत आहेत. यामागचे कारण अद्याप कोणीही सांगितले नसले तरी मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, असित मोदी याच्यासोबत त्याच्या नवीन करारावरून मतभेद झाले होते, त्यामुळे त्याने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजून काही कलाकारांनी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. जेठालालचे पात्र साकारणाऱ्या दिलीप जोशी याच्याशी देखील शैलेश लोढाचे वाद झाले होते. या कारणासाठी सुद्धा त्याने शो सोडला असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral News : हायवेवर रील बनवताना डान्स आणि स्टंट केलात तर होणार शिक्षा? किती दंड? काय आहेत नियम? वाचा

Maharashtra News Live Update: विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला प्रकरण, संतोष चव्हाणचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

ChatGPT 80s Photo Trend: ८०s रेट्रो लूकची क्रेझ वाढली; व्हायरल ट्रेंड 'असा' करा ट्राय

मनुस्मृतीविरोधी आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्याची प्रकृती बिघडली; तातडीनं रुग्णालयात दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, ८ व्या वेतन आयोगात ४० वर्षे जुना नियम बदलणार

SCROLL FOR NEXT