Sushmita Sen Instagram @sushmitasen47
मनोरंजन बातम्या

Taali First Look Out: सुष्मिताचा ट्रान्सजेंडरच्या भूमिकेतील फर्स्ट लूक, तुम्हीही पडाल प्रेमात

ट्रान्सजेंडर अॅक्टिविस्ट श्री गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित वेबसीरीज लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सुष्मिता सेनने सुमारे तीन दशकांपूर्वी 'मिस युनिवर्स' (Miss Universe) हा किताब जिंकला होता. तिच्या सौंदर्याने, रुबाबाने आणि प्रभावी अभिनय कौशल्याने तिने लाखो मने जिंकली. सुष्मिताने 1996 च्या दास्ता या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले होते. बीवी नंबर 1, आघाज, क्यो की... मैं झुठ नहीं बोलता, समय: व्हेन टाइम स्ट्राइक्स, मैंने प्यार क्यूं किया?, डू नॉट डिस्टर्ब यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुष्मिता पुन्हा एकदा नवीन वेबसीरीजद्वारे (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुष्मिताने तिच्या सोशल मीडिया (Social Media) हँडलवरून तिच्या नवीन वेबसीरीजची घोषणा केली आहे. सुष्मिताने सांगितले की, ती 'ताली'मध्ये श्रीगौरी सावंत या ट्रान्सजेन्डर अॅक्टिविस्टची भूमिका साकारणार आहे. 'ताली'चा फर्स्ट लूक शेअर करत, सुष्मिताने कॅप्शन दिले: "ताली - बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी ! #firstlook #ShreegauriSawant. या सुंदर व्यक्तीची भूमिका साकारण्याची आणि तिची कथा जगासमोर आणण्याची संधी मला मिळाली यापेक्षा अभिमानास्पद काहीही नाही!! इथे जगण्याचा आणि सन्मानाने जगण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे!!! माझे तुमच्यावर प्रेम आहे!!! #duggadugga." ही वेबसीरीज प्रेक्षकांसमोर केव्हा येईल हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

काही दिवसांपूर्वी सुष्मिताने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत माहिती दिली होती की ती दुसर्‍या वेबसीरीजची तयारी करत आहे. "सनसेट..सेन राइज!!! आयुष्य खुप व्यस्त झाले आहे... एक नवीन वेबसीरीज शूट करण्यासाठी सज्ज होत आहे...माझ्या मनाला भिडणारी एक वेबसीरीज!! मला तुमची आठवण येते आणि माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे !!! #duggadugga," असे कॅप्शन तिने या पोस्टला दिले होते.

आर्या या वेवसीरीजच्या माध्यमातून सुष्मिताने डिजिटल क्षेत्रात पदार्पण केले होतो. या वेबसीरीज तिसरा सीझन सुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. परंतु तिसऱ्या सीझन केव्हा प्रदर्शित होईल याची घोषणा निर्मात्यांनी अद्याप केलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : भिमाशंकर सभामंडपाच्या मुकुटाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिष्ठापना

Shahrukh Khan: गुटख्याच्या जाहिरातींवरून शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ अडचणीत; कार्टाकडून समन्स जारी

Mumbai News : शिवतीर्थच्या अंगणात पांढरी पट्टी! मनसे नेते संदीप देशपांडेंचा जैन समाजाला इशारा

Maharashtra Politics : शरद पवारांना केंद्रीय मंत्र्याची मोठी ऑफर; काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याऐवजी भाजपसोबत येण्याचे आमंत्रण

Blood Pressure: BP च्या गोळ्यांमुळे किडनी खराब होते का? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली खरी माहिती

SCROLL FOR NEXT