Swara Bhaskar Blessed With Baby Girl Instagram @reallyswara
मनोरंजन बातम्या

Swara Bhasker Baby: स्वरा भास्कर- फहादने केलं चिमुकलीचं स्वागत; मुलीचा गोंडस फोटो शेअर करत नावही सांगितलं

Swara Bhaskar Baby Girl: स्वरा भास्करने इंस्टाग्रामवर पोस्ट करत मुलगी झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे.

Pooja Dange

Swara Bhaskar Blessed With Baby Girl:

अभिनेत्री स्वरा भास्करच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. स्वरा भास्कर आणि फहाद अहमद आई-वडील झाले आहेत. स्वरा भास्करने सोशल मीडियावर पोस्ट करत लेक झाल्याचे सांगितलं आहे. तसेच तिचे नाव देखील जाहीर केले आहे.

स्वरा भास्करने इंस्टाग्रामवर पोस्ट करत मुलगी झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. स्वराने फहादसोबत पोस्ट शेअर करत तिघांचा सुंदर फोटो शेअर केला आहे.

स्वरा भास्करने नवरा आणि मुलीसोबतच काही फोटो शेअर करत लिहिले आहे की, 'मी मनापासून प्रार्थना केली, देवाने अशिरावढी दिला, एक गाणे गुणगुणले, एक गूढ सत्य... आमची मुलगी 'राबिया'चा जन्म 23 सप्टेंबर 2023 रोजी झाला. कृतज्ञ आणि आनंदी अंतःकरणाने तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी खूप आभार! हे संपूर्ण नवीन जग आहे.'

या फोटोंमध्ये स्वरा आणि फहादने राबिया कुशीत घेतले आहे. तर हॉस्पिटलच्या बेडवर स्वरा झोपली दिसत आहे. तर स्वरा आणि फहाद लेकीशी खेळताना देखील या फोटोंमध्ये दिसत आहेत.

अभिनेत्री गौहर खानने स्वराच्या पोस्टवर कमेंट करत तिचे अभिनंदन केला आहे. तसेच बाळाला आशीर्वाद दिला आहे. नीना गुप्ता, मिनी माथूर, दिव्या दत्ता, कोंकना सेनशर्मा, सुमीत व्यास, सयानी गुप्तासह अनेकांनी स्वराचे अभिनंदन केले आहे. (Celebrity)

फेब्रुवारीमध्ये सपशेल मीडियावर पोस्ट करत स्वराने लग्न केल्याची घोषणा केली होती. समाजवादी पार्टीचे राज्य युवा अध्यक्ष फहाद अहमदशी स्वराने ६ जानेवारी २०२३ला लग्न केले होते. इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत स्वराने लव्हस्टोरी सांगितली होती. एका आंदोलनादरम्यान दोघांची भेट झाली. त्यांच्या भेटीगाठी वाढत केल्या आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT