Bigg Boss Marathi 5 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 Video: सूरजची गुलिगत स्टाईल; 'कोंबडी पळाली' गाण्यावर जान्हवीसह धरला ठेका, डान्सची होतेय चर्चा

Bigg Boss Maathi Dance Video Viral: बिग बॉसच्या घरात भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांनी जबरदस्त डान्स केला आहे. ज्याची सध्या तुफान चर्चा रंगलीये.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन 5 सध्या जबरदस्त चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांची जबरदस्त खेळी पाहायला मिळते आहे. शनिवारी आणि रविवारी भाऊच्या धक्क्यावर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बिग बॉस रितेश देशमुखने स्पर्धकांना हटके टास्क दिला होता. ज्यामुळे स्पर्धकांनी हा खेळ रंगवून सोडला.

भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांना 'जोडीचा मामला' असा टास्क देण्यात आला होता. दरम्यान बिग बॉसने अरबाज- आर्या, निक्की- अभिजीत, अंकिता- वर्षा, पॅडी- घन:श्याम, वैभव- डीपी स्पर्धकांच्या जोड्या बनवल्या. यानुसार स्पर्धकांनी जबरदस्त डान्स केला.

जान्हवी - सूरजचा भन्नाट डान्स

जान्हवी आणि सूरजने कोंबडी पळाली या गाण्यावर डान्स करत सर्वांचेच होश उडवले. या दोघांच्या हुकस्टेप्सने लक्ष वेधले. यावेळी या दोघांनी सूरज चव्हाणच्या फेमस 'झापूक झुपूक' वर देखील हुकस्टेप केली. सोशल मीडियावर या दोघांच्या डान्सची तुफान चर्चा आहे. नेटकऱ्यांनी जान्हवी आणि सूरजच्या डान्सचे कौतुक केले आहे.

निक्की- अभिजीतचा डान्स

निक्की आणि अभिजीतने कपल डान्स केला. यावेळी निक्की आणि अभिजीतने मैत्रीच्या गाण्यावर डान्स करत सर्वांच्याच नजरा वेधल्या आहेत. शाहरूख आणि काजोल यांच्या चित्रपटातील 'कुछ कुछ होता है' चित्रपटातील 'ये लडका है दीवाना' या गाण्यावर या दोघांनी डान्स परफॉर्मन्स केला आहे. निक्की आणि अभिजीतच्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

SCROLL FOR NEXT