Rajpal Yadav Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Rajpal Yadav: चेक-बाउन्स प्रकरणात अभिनेता राजपाल यादवला सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा मिळाला आहे. मात्र आत्मसमर्पण टाळण्यासाठी बुधवारपर्यंत ५ कोटी रुपये न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे जमा करावे लागणार आहेत.

Shruti Vilas Kadam

Rajpal Yadav: चेक-बाउन्स प्रकरणात शिक्षा झालेल्या अभिनेता राजपाल यादवला सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. ८ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आत्मसमर्पण करण्यापासून अंतरिम संरक्षण दिले आहे. मात्र, या दिलाशासाठी त्यांना बुधवारपर्यंत न्यायालयाच्या नोंदणी विभागाकडे ५ कोटी रुपये जमा करावे लागणार आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर राजपाल यादव आणि पत्नी राधा राजपाल यादव यांना दाखल केलेल्या याचिकांचा उल्लेख करण्यात आला. त्यांचे वकील सौरभ त्रिवेदी यांनी याचिकांबाबत तोंडी माहिती दिल्यानंतर न्यायालयाने नोटीस जारी केली.

बुधवारपर्यंत ५ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, याचिकाकर्त्यांनी बुधवारपर्यंत न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे ५ कोटी रुपये जमा केल्यास त्यांना आत्मसमर्पण करण्यापासून मुभा मिळेल. त्यामुळे राजपाल यादवला या रकमेची व्यवस्था करणे आवश्यक आहे. न्यायालयाने या प्रकरणातील पुढील सुनावणी १५ सप्टेंबरला ठेवली आहे.

सात चेक-बाउन्स प्रकरणांत शिक्षा

या प्रकरणाची सुरुवात दिल्ली उच्च न्यायालयाच्या १० जुलै २०२६ रोजीच्या आदेशापासून झाली. उच्च न्यायालयाने सात चेक-बाउन्स प्रकरणांमध्ये राजपाल यादव यांना दोषी ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला होता. प्रत्येक प्रकरणात त्याला तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसेच, सातही शिक्षा एकाच वेळी भोगण्याचे निर्देश देण्यात आले होते. याशिवाय प्रत्येक प्रकरणातील संबंधित तक्रारदाराला १.०५ कोटी रुपये देण्याचे आदेशही देण्यात आले होते. यातील १,०४,७५,००० रुपये नुकसानभरपाई म्हणून, तर २५ हजार रुपये राज्य सरकारकडे जमा करण्याचे निर्देश होते.

राधा यादव यांनाही आर्थिक रक्कम भरण्याचे आदेश

राजपाल यादवच्या पत्नी राधा यादव यांनाही या प्रकरणांमध्ये तक्रारदाराला ५,५१,३८० रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले होते. या कायदेशीर वादादरम्यान तक्रारदाराला यापूर्वीच २.२५ कोटी रुपये देण्यात आल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने नमूद केले होते.

दिल्ली उच्च न्यायालयाने २ महिन्यांचा अवधी दिला

ही प्रकरणे मे. मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडशी आणि अभिनेत्याच्या प्रोडक्शन कंपनीशी संबंधित चेक बाऊन्स प्रकरणावर आधारित आहे. राजपाल यादव यांची शिक्षा कायम ठेवताना, दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी दिला होता आणि त्या काळात त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील आदेशानुसार, ५ कोटी रुपये जमा करण्याच्या अटीवर त्यांना आत्मसमर्पणातून अंतरिम दिलासा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT