Rajnikanth Revealed Biggest Mistake Instagram
मनोरंजन बातम्या

Rajnikanth Revealed Biggest Mistake: ‘मला दारूचं व्यसन नसतं तर...’; सुपरस्टार रजनीकांतने बोलून दाखवली खंत

Superstar Rajnikanth Biggest Statement: ‘दारू पिणं ही माझी चूक आहे’ असं वक्तव्य रजनीकांत यांनी त्यांच्या चित्रपटाच्या म्यूझिक लाँचिंग कार्यक्रमात केलेलं अभिनेत्याचं हे वक्तव्य कमालीचे चर्चेत आले आहे.

Chetan Bodke

Rajnikanth Revealed Biggest Mistake In Life: थलैवा रजनीकांत नेहमीच आपल्या दर्जेदार चित्रपटामुळे चर्चेत राहतो. दमदार अभिनयामुळे जगभरात रजनीकांत यांना चाहते मानतात. लवकरच येत्या काही दिवसात रजनीकांत आणि तमन्ना भाटिया स्टारर ‘जेलर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाच्या म्युझिक लाँचिंग कार्यक्रमात रजनीकांत एका विधानामुळे बरेच चर्चेत आले आहे. ‘दारू पिणं ही माझी चूक आहे’ असं वक्तव्य रजनीकांत यांनी कार्यक्रमात केलंय, सध्या अभिनेत्याचे हे वक्तव्य कमालीचे चर्चेत आले आहे.

म्युझिक लाँचिंग इव्हेंटमध्ये मुलाखती दरम्यान रजनीकांत म्हणतात, “मला जर दारू पिण्याची वाईट सवय नसती तर, मी अनेक समाज उपयोगी चांगली कामं जनतेसाठी केली असती आणि सोबतच माझ्या करिअरकडेही लक्ष दिलं असतं. दारू पिणं ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक आहे. जर मी दारूचं व्यसन नसतं केलं तर मी समाजसेवेत समाज उपयोगी कामं केली असती. दारू पिणे पूर्ण बंद करा, असं नाही तर, किमान रोज तरी दारू पिऊ नका. दारूमुळे आपले आयुष्य धोक्यात येते. रोज मद्यपान केल्याने आपले आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता जास्त आहे.” यावेळी म्युझिक लाँचिंग इव्हेंटमध्ये रजनीकांत यांनी चाहत्यांना नेहमीच दारू न पिण्याचा सल्ला दिला आहे.

पण, रजनीकांत यांचं वाईट व्यसनाबद्दल बोलण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील ते, काहीवेळा बोलले आहेत. मध्यंतरी जानेवारी महिन्यामध्ये, ‘चारुकेसी’ या तामिळ नाटकाच्या एका कार्यक्रमाला रजनीकांत यांना स्पेशल गेस्ट म्हणून बोलवण्यात आले होते. त्यावेळी देखील त्यांनी व्यसनाधीनतेवर भाष्य केलं होतं. रजनीकांत यांनी आपल्या पत्नीचे आभार मानत प्रतिक्रिया दिली होती.

रजनीकांत म्हणतात, ‘मी तुम्हाला सर्वांना माझी पत्नी लताची ओळख करून देतोय. ज्यावेळी मी कंडक्टरची नोकरी करायचो त्यावेळी मला खूप दारू पिण्याचे व्यसन होते. आणि सोबतच दिवसाला किती सिगारेट पिऊन व्हायच्या याचा काही नेम नव्हता. मी रोज जेवणात चिकन, मटनच खायचो. पण त्यावेळी मला शाकाहारी लोकांचा खूप राग यायचा. माझ्या मते जे लोक दीर्घकाळ व्यसन करतात, ते ६० नंतर निरोगी आयुष्य जगू शकत नाहीत.” असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.

तर रजनीकांत यांचा आगामी चित्रपट ‘जेलर’ बद्दल बोलायचे तर, मुथुवेल पांडियन यांच्या भूमिकेत रजनीकांत दिसणार आहेत. तर प्रमुख भूमिकेत रजनीकांत व्यतिरिक्त तमन्ना भाटिया, शिवा राजकुमार, जॅकी श्रॉफ, मोहनलाल आणि योगी बाबू हे कलाकार दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीप कुमार यांनी केले आहे, तर चित्रपटाची निर्मिती सन पिक्चर्सच्या कलानिथी मारन यांनी केली आहे. यासोबतच रजनीकांत यांचा ‘लाल सलाम’ हा चित्रपट देखील प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT