Ashok Saraf Canva
मनोरंजन बातम्या

Ashok Saraf: महाराष्ट्राच्या महानायक पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार; Colors मराठीवर प्रेक्षकांना खळखळून हसवणार

Ashok Saraf New Serial on Colours Marathi: महाराष्ट्राचे महानायक आणि सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ 'अशोक मा.मा' या मालिकेतून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहुन चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Saam Tv

Marathi Entertainment Updates: मराठीसह हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेता आणि महाराष्ट्राचे महानायकम्हणून अशोक सराफ यांना ओखलं जातं. अशोक मामांनी आजवर अनेक मराठी आणि हिंदी भाषांमध्ये सुपरहिट चित्रपट, मालीका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. मध्यंतरी अशोक मामा काही दिवस छोट्या पडद्यापासून लांब होते. परंतु अशोक मामा पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला सज्ज झाले आहेत. "लवकरच येतोय 'महाराष्ट्राचा माहानायक'", असं म्हणत 'कलर्स मराठी' या वाहिनेनी लॉंच केला आहे. या मालिकेची पहिली झलक प्रदर्शित झाल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

'अशोक मा.मा' या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा छोट्या पडद्या दमदार कमबॅक करणार आहेत. या मालिकेचा प्रोमो 'कलर्स मराठी'च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रदर्शित झाला आहे. हा प्रोमो पाहताच मालिकेमध्ये काहीतर गूढ आणि थरारक असल्याचं समजत आहे.

या मालिकेमध्ये अशोक मामांची भूमिका अत्यंत शिस्तप्रिय, खबरदारी घोणारे आणि काटेकोर वागणारे अशी दिसत आहे. त्यासोबतच 'शिस्त म्हणजे शिस्त' हा त्यांच्या आयुष्याचा फंडा असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा त्यांच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणार आहेत. या प्रोमोच्या शेवटी अशोक मामांच्या घरावरील नेम प्लेटवर 'अशोक मा.मा.' असं लिहिलेलं दिसत आहे. मालिकेमध्ये नेमकं काय पाहायला मिळेल याबाबत चाहत्यांमध्ये उत्कंठा वाढली आहे. त्यासोबतच अशोक मामांसह या मालिकेमध्ये कोणते कलाकार पाहायला मिळणार या बद्दल चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

अशोक मामांची कलर्स मराठीवरील ही मालिका नेमकं कधी प्रदर्शित होणार याबद्दल निर्मात्यांनी कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिली नाही. परंतु लवकरच चाहत्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं मिळणार आहेत. मालिकेबद्दल बोलताना अशोक मामा म्हणाले की,"मालिका खूपच मनोरंजक असणार आहे. या मालिकेची कथा चिन्मय मांडलेकरने अत्यंत चागल्या पद्धतीनं लिहिली आहे. 'टन टना टन' या मालिकेनंतर 'कलर्स मराठी' या वाहिणीच्या माध्यमातून येणार आहे."

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT