Naomi Campbell's Met Gala appearance Instagram @vogueindia
मनोरंजन बातम्या

Naomi Campbell's Met Gala Appearance: मेट गालाच्या रेड कार्पेटवर चक्क साडीत अवतरली ही सुपर मॉडेल

Super Model In Saree At Met Gala 2023: नाओमी कॅम्पबेलच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Pooja Dange

Naomi Campbell Wear Saree In Met Gala: मेट गालामध्ये तुम्हाला अनेक सेलिब्रिटी वेगवगेळे आऊटफिट घालून रेड कार्पेटवर वॉक करतात. या फॅशन शो जगभरातील सर्वांचे लक्ष लागलेले असते. प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण याआधी देखील मेट गालामध्ये दिसल्या होत्या, परंतु आलिया भट्टने यावर्षी मेट गालामध्ये एंट्री केली आहे.

एक लाख मोत्यांचे नक्षीकाम असलेला पाढऱ्या रंगाचा गाऊन घालून आलिया मेट गालाच्या रेडकार्पेटवर दिसली. आलियाचे पांढऱ्या गाऊनमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर प्रियांकाचा ब्लॅक गाऊन लूकही चर्चेत आहे.

तसेच मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी देखील मेट गालामध्ये दिसली आहे. ईशाने ब्लॅक आऊट घातला आहे. या आऊटफिटवर डायमंडचे नक्षीकाम आहे. तसेच तिच्या गळ्यात देखील डायमंडचा नेकलेस आहे.

प्रियांका, आलिया आणि ईशा मेट गालामध्ये असताना नाओमी कॅम्पबेल हिची सर्वत्र चर्चा आहे. नाओमी कॅम्पबेलच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सुपरमॉडेल नाओमी कॅम्पबेल मेट गालामध्ये चक्क साडी नेसून आली आहे. तिच्या गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. नाओमीच्या साडीची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. तिचा लूकही कमालीचा दिसत आहे. तिची साडी नसून साडीच्या स्टाईलमधला गाऊन आहे. (Latest Entertainment News)

हा साडी स्टाइल केलेला गाऊन कार्ल लेजरफेल्डच्या 2010 च्या कलेक्शनमधील आहे. नाओमी कॅम्पबेलला साडीची आवड आहे आणि ती अनेक प्रसंगी साडीत दिसली आहे. त्यामुळे तिचा साडीसारखा हा ड्रेस मेट गालामध्ये सर्वांचे आकर्षण बनला आहे.

नाओमी कॅम्पबेलच्या पिंक साडीवर सिल्वर वर्क आहे. मेट गालामधील नाओमी कॅम्पबेलच्या लूकविषयी बोलायचे झाले तर, सुपरमॉडेल सिंपल लूकमध्ये दिसत आहे. तिने केस मोकळे सोडले आहेत. दोन्ही हातात कडे घातले आहेत. तसेच तिच्या बोटात अंगठी आहे. डोळ्यांना थिक आयलायनरसह नॅचरल मेकअप करून नाओमी कॅम्पबेल तिचा लूक पूर्ण केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

Narayan Rane : ...म्हणून मी शिवसेना सोडली; भाजप खासदार नारायण राणेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT