Sunny Leone Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sunny Leone सेटवर आली बंदूक घेऊन; Video व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

वृत्तसंस्था

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. व्यस्त वेळापत्रकानंतरही अभिनेत्री चाहत्यांसाठी सोशल मीडियावर वेळ काढायला विसरत नाही. सनी लिओनीने पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात शूटिंग सेटवरील तिचे सहकारी तिला जेवण देत नाहीत आणि स्वतः मजा करत आहेत. हे सगळं पाहून सनी लिओनीला राग येतो आणि ती हातात बंदूक घेऊन आपल्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचते. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सनी लिओनीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सनी असे म्हणताना दिसत आहे की शूटिंगनंतर ते थकले आहेत आणि हे लोक स्वतः जेवन करत आहेत आणि मला विचारतही नाहीत. बघ मला किती सहन करावे लागते. सनी लिओनीने हा व्हिडिओ मजेशीर कॅप्शन देऊन पोस्ट केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले: "जेव्हा तुम्ही काम करत असता आणि हे लोक फक्त जेवत असतात." सनीचा हा व्हिडिओ 6 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

सनी लिओनी तिच्या आगामी 'शेरो' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जो एक थ्रिलर चित्रपट आहे. जो 4 भाषांमध्ये प्रदर्शीत होणार आहे. याशिवाय सनी लिओनी लवकरच विक्रम भट्टच्या अॅक्शन वेब सिरीज 'अनामिका' मध्ये दिसणार आहे. तसेच, ती 'कोका कोला', 'रंगीला' आणि 'वीरमादेवी' या हॉरर कॉमेडी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. बिग बॉसमध्ये आल्यानंतर सनी लिओनीची लोकप्रियता वाढतच गेली आहे. इन्स्टाग्रामवर 47.6 दशलक्षाहून अधिक लोक तिला फॉलो करतात.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT