Dono Movie will Released soon  Saam TV
मनोरंजन बातम्या

Dono Released Date Out: राजवीर-पालोमाची लव्ह स्टोरी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; 'दोनों'ची रिलीज डेट आऊट

Rajveer - Paloma Romantic Movie: दोनों चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Pooja Dange

Dono Released Date:

नवोदित दिग्दर्शक अवनीश एस बडजात्या यांच्या आगामी चित्रपटाचा टीझर आणि गाण्याने लोकांच्या मनाला स्पर्श केला आहे. लोक नवोदित राजवीर देओल आणि पलोमा यांच्यातील केमिस्ट्रीकडे पाहून आकर्षित झाले आहेत. तसेच चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान, निर्मात्यांनी जाहीर केले की हा चित्रपट 5 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

एक भव्य डेस्टिनेशन वेडिंग ही पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटामध्ये वधूचा मित्र देव (राजवीर) वराची मैत्रिण मेघना (पालोमा) हिला भेटतो. एका भव्य भारतीय विवाहादरम्यान, दोन अनोळखी व्यक्तींमध्ये एक हृदयाला स्पर्श करणारा प्रवास सुरू होतो. रोमान्स, रिलेशनशिप आणि प्रेम सेलिब्रेट करणाऱ्या चित्रपटामध्ये शहरी कथा दाखविण्यात आली आहे. (Celebrity)

राजश्री प्रॉडक्शन हाऊसने नवीन कलाकारांना लॉन्च करण्याचा 75 वर्षांचा वारसा सुरू ठेवला आहे. या प्रॉडक्शनमध्ये सर्वच माध्यमांमधून नवीन कलाकारांना आणि कलागुणांना वाव दिला आहे. राजश्री प्रॉडक्शन (पी) लिमिटेड अवनीश एस बडजात्या दिग्दर्शित जिओ स्टुडिओज “दोनों” च्या संयुक्त विद्यमाने आपला 59 वा चित्रपट सादर करत आहे.

कमलकुमार बडजात्या, दिवंगत राजकुमार बडजात्या आणि अजितकुमार बडजात्या यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सूरज आर. बडजात्या हे या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत.

"दोनों" तुमच्या जवळच्या सिनेमागृहात 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT