Gadar 2 Day 10th Day Box Office Collection Saam TV
मनोरंजन बातम्या

Gadar 2 Collection: 'गदर 2'ची 400 कोटींकडे वाटचाल, 10 व्या दिवशी मोडला फर्स्ट डे कलेक्शनचा रेकॉर्ड

Pooja Dange

Gadar 2 Box Office Collection Day 10:

सनी देओलचा चित्रपट 'गदर २' बॉक्स ऑफिस कमाल करत आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाची क्रेझ वाढत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन १० दिवस झाले आहेत. पण चित्रपटाचे कलेक्शन पहिल्या दिवसापेक्षा जास्त आहे.

'गदर २' चित्रपट ११ ऑगस्ट ला प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ४०.१ कोटींची कमाई करत सुरुवात केली. एवढ्या तीन दिवसात या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला. पहिल्या ३ दिवसात चित्रपटाने एकूण १३४.८८ कोटींचे कलेक्शन केले.

'गदर २' दुसरा आठवड्याच्या सुरुवातीलाच हिट ठरला. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यापासून नवीन रेकॉर्ड बनवायला सुरुवात केली. दुसऱ्या आठवड्याच्या वीकेंड चित्रपटाने दमदार कामगिरी केली आहे.

'गदर २'ने शुक्रवारी देशभरात २० कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले. तर दुसऱ्या शनिवारी या चित्रपटाचे कलेक्शन ३१.०७ कोटी झाले. १०व्या दिवशी म्हणजे रविवारी 'गदर २' चित्रपटाने ३५० कोटींचा आकडा पार केला आहे, असे सॅकनिल्क अहवालात सांगण्यात आले आहे.

गदर २च्या अर्ली ट्रेंडनुसार रविवारी चित्रपटाने देशभरातील बॉक्स ऑफिसवर ४१ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यासह चित्रपटाने १० व्य दिवशी संपूर्ण देशात ३७७.२० कोटींचे कलेक्शन केले आहे.

'गदर २'चे कलेक्शन

१ दिवस- ४०.१० कोटी

२ दिवस - ४३.०८ कोटी

३ दिवस- ५१.७० कोटी

४ दिवस- ३८.७० कोटी

५ दिवस- ५५.४० कोटी

६ दिवस- ३२.३७ कोटी

७ दिवस- २३.२८ कोटी

८ दिवस- २०.५० कोटी

९ दिवस- ३१.०७ कोटी

१० दिवस- ४१.०० कोटी

सनी देओलचा चित्रपट बॉक्स ऑफिस घवघवीत यश मिळवत आहे, तर दुसरीकडे त्याची प्रॉपर्टी लिलावात काढण्यात आली आहे. सनी देओलवर बँकेचे खूप कर्ज आहे. त्यामुळे बँकेने रिकव्हरीसाठी त्याची मुंबईतील प्रॉपर्टीचा लिलाव होत असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

परंतु बँक ऑफ बडोदाने या लिलावाला आता स्थगिती दिली आहे. २४ तासात बँकेने हा निर्णय घेतला आहे. कदाचित हा 'गदर २'च्या यशाचा परिणाम असू शकतो, असे म्हटले जात आहे.

नुकताच हेमा मालिनी यांनी हा चित्रपट पहिला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर हेमा मालिनी यांनी चित्रपटाचे तसेच मुलगा सनी देओलचे देखील भरभरून कौतुक केले आहे. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune CA Death Case: सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

SCROLL FOR NEXT