५ कोरोना रुग्ण आढळल्याने सुनील शेट्टीची इमारत सील
५ कोरोना रुग्ण आढळल्याने सुनील शेट्टीची इमारत सील Saam Tv
मनोरंजन बातम्या

५ कोरोना रुग्ण आढळल्याने सुनील शेट्टीची इमारत सील

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी Sunil Shetty राहत असलेली दक्षिण मुंबईतील Mumbai 'पृथ्वी अपार्टमेंट्स' नावाची इमारत सील करण्यात आली आहे. सुनील शेट्टी राहत असलेल्या इमारतीमध्ये Building कोरोनाचे Corona ५ रुग्ण आढळून आले आहे त्यामुळे मुंबई महापालिकेने इमारत सील करण्याचा निर्णय घेतला आहे. Sunil Shetty's building sealed after 5 corona patients were found

महापालिकेचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड Prashant Gaikwad यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, ही इमारत कोदोन दिवसांपूर्वी सील केली आहे. सुनील शेट्टी मागील काही वर्षांपासून अल्टामाऊंट रोडवरील 'पृथ्वी अपार्टमेंट' मध्ये राहत आहे. त्याच्यासोबत पत्नी, मुलगी आणि मुलगा अहान शेट्टी हे देखील याच इमारतीत राहतात.

हे देखील पहा -

प्रशांत गायकवाड यांनी सुनील शेट्टी यांच्या परिवारातीला कुठल्याही सदस्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. सुनील शेट्टीच्या प्रवक्त्यांनी देखील याला दुजोरा दिला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात कुठल्याही इमारतीमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण सापडल्यास इमारतीला मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषित करुन इमारत सील केली जाते. Sunil Shetty's building sealed after 5 corona patients were found

दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासात ८,५३५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ६१,५७,७९९ इतकी झाली आहे. तर ६०१३ रुग्ण कोरोनमुक्त झाले असून घरी गेले आहेत. एकूण बरे झालेल्यांची संख्या ५९,१२,४७९ इतकी आहे. तसेच गेल्या २४ तासात १५६ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण १,२५,८७८ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १,१६,१६५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९६.०२ इतका झाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boycott Election : मेणबत्ती पेटवत मतदान न करण्याची घेतली शपथ; कळमदरी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

Solapur Breaking: भाजप उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

Technology Tips: एसीची कूलिंग घरबसल्या वाढवायची आहे? फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स

Raigad News: अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला प्रकरण, भरत गोगावलेंच्या मुलासह २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

Life Success Tips : शहाणे असाल तर आयुष्यातील 'या' गोष्टी कधीच कुणालाही सांगू नका, अन्यथा पश्चाताप होईल

SCROLL FOR NEXT