Sumona Chakravarti News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sumona Chakravarti : कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन बायकोने शो का सोडला ? अभिनेत्री नव्या भूमिकेच्या शोधात

Sumona Chakravarti News : सुमोनाला आता पुन्हा कॉमेडी शोमध्येच काम करायचं नसून तिला ॲक्शन, इंटॅलिजन्स ऑफिसर किंवा व्हिलनची भूमिका करायची आहे, असं तिने सांगितले.

Chetan Bodke

'द कपिल शर्मा शो' फेम सुमोना चक्रवर्ती सध्या चर्चेत आहे. तिला 'द कपिल शर्मा शो'मधून काढून टाकण्यात आल्याची चर्चा झाली होती. मला शोमधून काढून टाकलं नाही किंवा काढून टाकलं असं काहीही नसून शो संपल्यानंतर मी माझ्या दुसऱ्या कामांमध्ये व्यग्र झाले असं उत्तर तिने स्वत: दिले. सुमोनाला आता पुन्हा कॉमेडी शोमध्येच काम करायचं नसून तिला ॲक्शन, इंटॅलिजन्स ऑफिसर किंवा व्हिलनची भूमिका करायची आहे, असं एका मुलाखतीत तिने सांगितले.

सुमोना चक्रवर्तीने पीटीआय न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत तिला तिच्या ड्रीम भूमिकांबद्दल सांगितलं. "मला हार्डकोर ॲक्शन, थ्रिलर किंवा सायकॉलॉजिकल थ्रिलर भूमिका करायच्या आहेत. त्याशिवाय मला क्राईम आणि रक्तरंजित कलाकृती पाहायला आवडतात. मला जर इंटॅलिजन्स ऑफिसर किंवा हार्डकोर व्हिलनची भूमिका करण्याची संधी मिळाली तर मी नक्की करेल. कारण मला तसे चित्रपटही पाहायला आवडतात." अशी प्रतिक्रिया तिने दिली.

मुलाखतीत सुमोना चक्रवर्तीने पुढे सांगितले की, "सेलिब्रिटी केव्हाच अभिनयाच्या बाबतीत समाधानी नसतो. तो कायमच वेगवेगळ्या भूमिकेच्या शोधात असतो. मी आता ठरवलंय की, फक्त कॉमेडीच भूमिका न साकारता मी यापुढे वेगवेगळ्या भूमिका करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी माझ्या इच्छा आता यापूढे नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. सध्या ओटीटीकडे ही प्रेक्षकांचा कल जास्तीत जास्त आहे. ओटीटीवरही खूप चांगले चित्रपट आणि वेबसीरीज येत आहेत."

"मला आशा आहे की, इंडस्ट्रीतील लोकं माझ्यासोबत काम करतील, मी नव्या भूमिकेंसाठी तयार आहे." शिवाय अभिनेत्रीने हॉलिवूडपटातील काही फेमस रोल करण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. सोबतच तिने 'लापता लेडीज' आणि 'लस्ट स्टोरीज २' चे कौतुक करत मला यांसारख्या चित्रपटात काम करायचे आहे, अशी तिने इच्छा व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT