Suhana Khan and Khushi Kapoor  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Koffee With Karan 7 : सुहाना खान आणि खुशी कपूर 'कॉफी विथ करण' मध्ये करणार एन्ट्री

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण-७' प्रसारित झाल्यापासून या शोची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या(Karan Johar) चॅट शो 'कॉफी विथ करण-७' प्रसारित झाल्यापासून या शोची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या शोबाबत रोज काही ना काही रंजक वृत्त समोर येतच असते. आता देखील अशीच एक बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खान(Suhana Khan) आणि बोनी कपूर-श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर(Khushi Kapoor) या चॅट शोच्या आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहेत. 'आर्चीज गँग' या झोया अख्तर दिग्दर्शित सिनेमाच्या प्रोमोशन निमित्ताने या दोघी या चॅट शोमध्ये सहभागी होणार आहेत.

'कॉफी विथ करण-७' या शोबाबत प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्स या शोचा भाग बनले असले तरी विशेष म्हणजे यावेळी साऊथचे सुपरस्टार्सही या शोमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत. शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू अभिनेता अक्षय कुमारसोबत या शोमध्ये सहभागी झाली होती. आता आगामी एपिसोड्समध्ये अनन्या पांडेसोबत साऊथचा प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा दिसणार आहे. यावेळी समंथा- विजय देवरकोंडा यांनी वेगवेगळ्या एपिसोड्सद्वारे या शोमध्ये पदार्पण केले आहे.

माहितीनुसार, सुहाना खान कॉफी विथ करणच्या सातव्या सीझनमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती खुशी कपूरसोबत या शोमध्ये दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 'आर्चीज गँग' या सिनेमामध्ये सुहाना खान आणि खुशी कपूर एकत्र डेब्यू करणार आहेत. या शोमध्ये दोघेही त्यांचा बॉलिवूड प्रवासाला सुरुवात करणार असून या शोमध्ये 'द आर्चीज' सिनेमाच्या शूटिंगचे अनुभव आणि किस्से सांगणार आहेत.

सुहाना आणि खुशीच्या 'कॉफी विथ करण'मधील एंट्रीबाबत शोच्या निर्मात्यांकडून किंवा या दोन्ही स्टार्सकडून अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण या बातमीमुळे सुहाना आणि खुशीचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यातून चितळाचं सुरक्षित रेस्क्यू

Whatsapp New Feature: तुम्हाला मिळालेली माहिती खरी की खोटी? Whatsapp देणार खात्री, जाणून घ्या नवं फिचर

Car Accident : भीषण अपघात; अनियंत्रण कार ४० फुटावरून नदीत कोसळली, तरुणाचा जागीच मृत्यू

Ganpati Bappa 2025: उजवी की डावी? शास्त्रानुसार कोणत्या सोंडेचा गणपती बाप्पा घरी बसवणं असतं शुभ?

Today Gold Rate : गणेशोत्सवापूर्वी सोनं-चांदी महागली, सोन्याचे दर १००० तर चांदी २५०० रुपयांनी वाढले, आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT