Subodh Bhave Traveled In Mumbai Local Instagram @subodhbhave
मनोरंजन बातम्या

Subodh Bhave Video : सुबोध भावाची लोकलवारी ; सोशल मीडियावर व्हिडिओ केला शेअर

Subodh Bhave Share Video : नुकताच सुबोध भावाने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Subodh Bhave Traveled In Mumbai Local : अभिनेता सुबोध भावे मराठीतील एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. सुबोध नेहमीच नवनवीन विषय असलेले चित्रपट घेऊन आपल्या भेटीला येत असतो. विशेषतः सुबोध बायोपिक चित्रपटातील त्याच्या भूमिकांसाठी जास्त प्रसिद्ध आहे.

चित्रपटामध्ये सक्रिय असलेला सुबोध भावे सोशल मीडियावर देखील तितकाच सक्रिय आहे. तो नेहमीच त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या जीवनातील अपडेट शेअर करत असतो. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Latest Entertainment News)

सुबोध भावेने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. य व्हिडिओच्या सुरुवातीला रेल्वेचे प्लॅटफॉर्म दिसत आहे. त्यानंतर कॅमेरा फिरतो आणि सुबोध भावेचे आपल्याला दर्शन होतात. डोक्यावर टोपी आणि ब्लू टी-शर्ट घातलेला सुबोध भावे ट्रेन प्रवास करत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटेल. मात्र सुबोध भावे गोड हसत आहे.

सुबोध भावेचा हा व्हिडिओ मुंबईच्या लोकल ट्रेनमधील आहे. तसेच सुबोधने कॅप्शनमधील हॅशटॅग द्वारे सांगितले आहे. त्याच्या या व्हिडिओवर नेकरी कमेंट करत आहेत. सुबोधचे कौतुक करत असताना नेटजरी त्यांच्या आठवणी देखील या पोस्टच्या कमेंटमध्ये शेअर करत आहेत.

सुबोधच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर त्याच्या वाळवी हा चित्रपट खूप गाजला. त्यानंतर सुबोध हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदुलकरसोबत फुलराणी चित्रपटामध्ये दिसला होता. तसेच त्याने नसरुद्दीन शाह यांच्यासोबत 'ताज'मध्ये देखील काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Facial Hair in Women: महिलांना दाढी मिशी का येते? माहितीये का कारण?

मुंबईत मोठा राडा; ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची हाणामारी, नेमकं काय घडलं?

Lighweight Saree Designs: दिवसभर साडीत राहायचंय? मग हलक्या साड्यांचे 'हे' 5 लेटेस्ट पॅटर्न नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: अमरावतीत मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज...

होय, मी बाजीरावच! अजित पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर, VIDEO

SCROLL FOR NEXT