Ajay Purkar Saam tv
मनोरंजन बातम्या

Ajay Purkar News: मराठी नाणं खणखणीत वाजलं; 'सुभेदार' फेम अभिनेते अजय पूरकर यांची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एन्ट्री

Ajay Purkar News: सुभेदार फेम अभिनेते अजय पूरकर यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.

Vishal Gangurde

Ajay Purkar Latest News In Marathi:

'सुभेदार' चित्रपटाची सिनेसृष्टीत जोरदार चर्चा सुरू आहे. तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सुभेदार’ चित्रपटात अभिनेते अजय पूरकर यांनी भूमिका निभावली आहे. सुभेदार फेम अभिनेते अजय पूरकर यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. (Latest Marathi News)

सुभेदार फेम अभिनेते अजय पूरकर यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अजय पूरकर यांनी अभिनयाच्या जोरदावर चाहत्यांच्या मनावर गारूड केलं आहे. पूरकर यांनी अभिनयाच्या जोरावर दाक्षिणात्य सिनेसृष्टीलाही भुरळ घातली आहे.

अभिनेते अजय पूरकर आता लवकरच ‘स्कंदा’ या दाक्षिणात्य अ‍ॅक्शन चित्रपटात दिसणार आहेत. 'स्कंदा' चित्रपट १५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. जय पूरकर यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटात साकारलेली बाजीप्रभू देशपांडे साकारली होती. या चित्रपटातील भूमिका प्रसिद्ध तेलुगू दिग्दर्शक बोयापती श्रीनिवास यांना प्रचंड आवडली.

पूरकर यांचा अभिनय सर्वात आधी ‘स्कंदा’ चित्रपटाचे डीओपी संतोष देटाके यांनी पाहिलं. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शक बोयापती श्रीनिवास यांना माहिती दिली. त्यांचं काम पाहूनच अजय पूरकर यांना ‘स्कंदा’ चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली.

दाक्षिणात्य सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्यानंतर अजय पूरकर म्हणाले, ' अनुभवसमृद्ध वेगवेगळ्या भूमिका करणं हे कलाकाराचं स्वप्नं असतं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्यांची कामाप्रती मोठी श्रद्धा असते. या सर्व बाबी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत'.

'स्कंदा या चित्रपटामुळे या सर्वांचा अनुभव घेता आला. एका उत्तम कॅनव्हासवर काम केल्याचा आनंद आहे, असेही अजय पूरकर पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Crime: मेहुण्याच्या प्रेमात झाली वेडी, जगात येण्यापूर्वीच बाळाला संपवलं अन् कचऱ्यात फेकलं

Marathi Vijay Melava: ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी वरळी डोमबाहेर मराठी जनसागर|VIDEO

SCROLL FOR NEXT