Emraan Hashmi
Emraan Hashmi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Emraan Hashmi : काश्मीरमध्ये इमरान हाश्मीवर दगडफेक; आरोपीला अटक

Shivani Tichkule

इमरान हाश्मी काश्मीर: बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) सध्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. मात्र, इथे इमरान हाश्मीवर दगडफेक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. इमरान हाश्मी संध्याकाळी शूटिंग संपवून बाहेर आला तेव्हा काही लोकांनी त्याच्यावर दगडफेक केली.

या प्रकरणी पहलगाम पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांवर कलम 147, 148, 370, 336, 323 लावण्यात आले आहेत. तसेच दगडफेक करणाऱ्याची ओळख पटल्यानंतर त्याला पोलिसांकडून (Police) अटक करण्यात आली आहे. (Emraan Hashmi Latest News)

हे देखील पाहा -

नेमकं काय घडलं?

हाश्मी सध्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये त्याच्या आगामी चित्रपट 'ग्राउंड झिरो'चे शूटिंग करत आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, 18 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 07:15 वाजता शूट संपल्यानंतर उर्वरित टीमसह पहलगामच्या मुख्य बाजारपेठेकडे जात होता. यावेळी काही अज्ञात लोकांनी त्याच्यावर दगडफेक करायला सुरुवात केली. या प्रकरणी पहलगाम पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोबतच या चोरट्याचीही ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली आहे.

'ग्राउंड झिरो'चे दिग्दर्शन तेजस देउस्कर करत आहेत. याशिवाय इमरान हाश्मी अक्षय कुमारच्या 'सेल्फी' आणि 'टायगर 3'मध्ये सलमान खानसोबत दिसणार आहे. 'टायगर 3' मधील इमरानचे पात्र निगेटिव्ह असणार असल्याचा दावा केला जात आहे. अलीकडेच अभिनेता 'डिबुक' आणि 'चेहरे'मध्ये दिसला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: काँग्रेसच्या माजी नगरसेविका मीरा पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

Abhishek Ghosalkar: हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सर्व CCTV फुटेज कुटुंबियांना दाखवा: हायकोर्ट

Night Skin Care: मुलायम त्वचेसाठी रात्री झोपण्यापुर्वी करा 'या' गोष्टी

Sonalee Kulkarni : दुबईमध्ये उगवली शुक्राची चांदणी; साडीत खुललं अप्सरेचं सौंदर्य

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत भर; नायब राज्यपालांनी केली NIA द्वारे चौकशीची मागणी, काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT