Lagnanantar Hoilach Prem  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Serial: पायाला गंभीर दुखापत डॉक्टरांनी दिला सर्जरीचा सल्ला; 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतून ही अभिनेत्री घेणार ब्रेक?

Marathi Serial: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम कश्मिरा अभिनेत्री जखमी झाली आहे. डॉक्टरांनी तिला सर्जरीचा सल्ला दिल्याने मालिकेतून ती ब्रेक घेणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Shruti Vilas Kadam

Lagnanantar Hoilach Prem: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील खलनायिका रम्या म्हणजेच अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी सध्या चर्चेत आली आहे. कश्मिराच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याचबरोबर डॉक्टरांनी तिला सर्जरी करण्याचाही सल्ला दिलाय. त्यामुळे आता अभिनेत्री मालिकेतून ब्रेक घेणार का? असा प्रश्न उपस्थित झाला असून यावर आता कश्मिरानं भाष्य केलं आहे.

'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सर्जरीबद्दल बोलताना कश्मिरा कुलकर्णी म्हणाली, 'एसिअल कट आहे आणि डॉक्टरांनी सर्जरी सांगितली आहे. मला सेटवर खूप सपोर्ट करतायत. लागलेलं आहे हे कळल्यावर त्यांना लगेच रिपोर्ट्स पाठवले. सगळे खूप प्रेमाने काळजी घेतायत. एकतर बसून किंवा उभं राहून डायलॉग्स दिला जातो. कारण, मला हालचाल नाही करता येत.

मालिकेतून ब्रेक घेणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना कश्मिरा म्हणाली की, 'अजून एक-दोन डॉक्टरांना विचारतेय. त्यांचंही जर तेच मत असेल तर मग मला ब्रेक घ्यावा लागेल. सर्जरी म्हटलं तर तीन, साडेतीन महिने मला त्यासाठी द्यावे लागतील. पण, यासाठी टिमला ऍडजस्ट करायला सांगणं मलाच योग्य वाटत नाही.'

कश्मिरा कुलकर्णी ही मालिकेत ‘रम्या’ची भूमिका साकारत असून तिचा खलनायकी अंदाज प्रेक्षकांच्या विशेष पसंत पडला आहे. तिच्या व्यक्तिरेखेमुळे मालिकेला वेगळं वळण मिळालं असून, तिच्या अनुपस्थितीत कथानकात मोठे बदल होऊ शकतात. मात्र, ती खरंच मालिकेतून काही काळासाठी दूर जाणार की कथेत काही नवीन ट्विस्ट आणला जाणार, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT