Pushpa 2 The Rule Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 The Rule: अल्लु अर्जूनच्या 'पुष्पा 2: द रुल'च्या रिलीज डेटबाबत मोठी घोषणा, 'या' दिवशी येतोय भेटीला

Pushpa 2 The Rule Movie: पुष्पा 2 चित्रपटाचा ट्रेलर मागच्या वर्षी 8 एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाला रिलीज करण्यात आला होता. ज्याला अल्लू अर्जुनच्या चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले आणि यासोबतच ट्रेलरला काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळाले होते.

Priya More

Pushpa 2 Release Date Update:

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) या बहुप्रतीक्षित चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द राइज'च्या जबरदस्त यशानंतर आता त्याचा हा 'पुष्पा 2'हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट कधी रिलीज होणार याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. अशामध्ये आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी रिलीज डेटबाबत महत्वाची माहिती दिली आहे. त्यांची सोशल मीडिया पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुष्पा 2 चित्रपटाचा ट्रेलर मागच्या वर्षी 8 एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाला रिलीज करण्यात आला होता. ज्याला अल्लू अर्जुनच्या चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले आणि यासोबतच ट्रेलरला काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळाले होते. आता अल्लू अर्जुनचे चाहते चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. पुष्पा 2 चित्रपटाची निर्मिती Mythri Movies च्या बॅनरखाली होत आहे.

पुष्पा 2 चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज रिलीज डेटबाबत महत्वाचे अपडेट्स दिले आहेत. निर्मात्यांनी सांगितले की, 'आता पुष्पा 2 च्या रिलीजसाठी फक्त 200 दिवस उरले आहेत.' म्हणजेच 200 दिवसांनंतर पुष्पा राज चित्रपटगृहांवर राज्य करणार आहे.

'पुष्पा 2: द रुल'चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'पुष्पा 2: द रुल'ची निर्मिती मायथ्री मूव्ही मेकर्स आणि मुत्तमशेट्टी मीडिया यांनी संयुक्तपणे केली आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Pushpa 2 Release Date Update

अल्लू अर्जुनच्या पात्राचा सुरुवातीचा प्रवास 'पुष्पा द राइज'मध्ये दाखवण्यात आला होता. या चित्रपटात अभिनेता चंदन तस्कराच्या भूमिकेत दिसला होता. जो हळूहळू मोठा तस्कर बनतो. दरम्यान, वेगाने प्रगती करत असलेल्या पुष्पा राजला अनेक शत्रूंचा सामना करावा लागतो. ज्यांच्यासोबत अभिनेता पुष्पा 2 मध्ये भिडताना दिसणार आहे. दरम्यान, 'पुष्पा द राइज'मुळे अल्लू अर्जुन भारताचा स्टार झाला होता. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Labour Codes: केंद्राचा मोठा निर्णय! आता ५ नव्हे तर एका वर्षात मिळणार ग्रॅच्युइटी; कामगार कायद्यात महत्त्वाचे बदल

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

SCROLL FOR NEXT